esakal | Wildlife Day Special : हरणांची वाढती संख्या वाघ संवर्धनाचे एक पाऊल 

बोलून बातमी शोधा

Wildlife Day Special story by shivaji yadav kolhapur Wildlife marathi news}


जिल्ह्यात ७०० वर हरणे; पश्‍चिम जंगलात अस्तित्व ठळक

Wildlife Day Special : हरणांची वाढती संख्या वाघ संवर्धनाचे एक पाऊल 
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : वाघाचे संरक्षण व संवर्धनाबाबत देशभर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांच्या जंगलात हरीण वर्गीय वन्यजीवांची संख्या वाढत आहे, कोकणातून घाट माथ्यावर स्थलांतरित होणाऱ्या सांबर, चितळांनी जंगलची शान वाढवली आहे. जिल्ह्यात त्यांची संख्या ७०० हून अधिक असल्याने वाघांना पुरेसे खाद्य उपलब्ध झाले आहे.

हरणांची वाढती संख्या वाघ संवर्धनाचे एक पाऊल ठरत आहे. जिल्ह्यात चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, तर सांगली जिल्ह्यात चांदोली व सातारा जिल्ह्यात कोयनानगर हा जंगली पट्टा आहे. यात कोल्हापुरातील अंबाई धनगरवाड्यापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. सर्वच टप्प्यात घनदाट जंगल डोंगर, दऱ्या घाट माथे, सडा आहेत. या पठारांवर थोडा पाऊस झाला तरी गवत उगवते. असे गवत मुबलक असल्याने येथे हरणांचा अधिवास आहे.  

सांबर- जवळपास २५० किलोपर्यंत वजन असते नर, मादी व पिल्लू असे कुटुंब कळपाने सांबर वावरते. 


चितळ - अंदाजे शंभर किलोपर्यंत वाढ होते. पिवळसर, तपकीरी रंगाचे डागपाठीवर माणेवर आहेत. बहुतांशी वेळा कोकणी जंगलात वावरतो, उन्हाचे दिवस सुरू झाले की कोकणातील उकाडा सहन होत नाही, तेव्हा चितळ घाट चढून माथ्यावरील जंगलात येतात.

हेही वाचा- येडियुराप्पा सरकारला धक्का ; मंत्री रमेश जारकीहोळी व्हिडीओ व्हायरल

भेकर-बकरी एवढ्या आकाराचे असते. २० ते ५० किलोपर्यंत वजन असते. पिवळसर तांबूस रंगाची कातडी असते. चपळ असते, गेळा-भेकर व चितळ यांच्याशी साधर्म्य असलेला हा प्राणी आहे.सांबर, भेकर, चितळ, गेळा हे पश्‍चिम जंगलात आढळतात. लाजूळ, उमदा, चपळ, सौंदर्यवान वन्यजीव आहे. तृणभक्षक प्राणी व मांसभक्षक प्राणी यांच्यातील मधल्या फळीत हा प्राणी आहे. त्याला इजा पोचवू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली तर वाघ संवर्धनाचे एक पाऊल पुढे पडेल.
- दत्ता पाटील,  प्र. वनक्षेत्रपाल पाटणे.

संपादन- अर्चना बनगे