
भाचा ५० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकला. या आनंदात मित्रमंडळींसोबत घरासमोरील पटांगणात मामांनी हवेत गोळीबार करत जल्लोष केला.
व्हिडिओ : भाच्याने घेतला स्टार, मामाने उडवला हवेत बार....
कोल्हापूर - धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याने मामाने चक्क हवेतच गोळीबार करत आनंद साजरा केल्याची आश्चर्यकारक घटना कोल्हापुरात घडली आहे. हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाचा ५० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकला. या आनंदात मित्रमंडळींसोबत घरासमोरील पटांगणात मामांनी हवेत गोळीबार करत जल्लोष केला तर इतरांनी ही यावर टाळ्या वाजवत दाद दिली. एकदा दोनदा नव्हे तर चारवेळा हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे गावातील लोकही घाबरून गेले. अनेकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले. या हवेत गोळीबार करतानाचे चित्रीकरणही असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही होत असून पोलीस काय कारवाई करतात ? याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.