esakal | विना पास कर्नाटकात नो एन्ट्री... संबधित नागरिकांना जिल्ह्याबाहेरच रोखण्याच्या सूचना  
sakal

बोलून बातमी शोधा

without pass no entry in karnataka

पास नसले तर त्याला कर्नाटक राज्यात सोडूच नका, अशा सूचना संबधित प्रशासनाकडून जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाल्या आहेत.

विना पास कर्नाटकात नो एन्ट्री... संबधित नागरिकांना जिल्ह्याबाहेरच रोखण्याच्या सूचना  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महाराष्ट्रासह इतर राज्यातून विना पास येणाऱ्या नागरिकांना कर्नाटकात नो एन्ट्री अशी भूमिका तेथील प्रशासनाने घेतली आहे. पास नसले तर त्याला कर्नाटक राज्यात सोडूच नका, अशा सूचना संबधित प्रशासनाकडून जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार किणी टोल तपासणी नाक्‍यावर पोलिसांना आता अधिक सर्तक राहावे लागत आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरातील नागरिक आपापल्या घरी जाण्यासाठी धडपडत आहेत. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक मध्यप्रदेश, बिहार, हरियाणा, राज्यस्थान, आसामकडे जात आहेत. त्यांना रेल्वेसह इतर वाहनांची सुविधा उपलब्ध करून त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून पोलिस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. हिच परिस्थिती इतर सर्व राज्यात आहे. कर्नाटकही त्याला अपवाद नाही. कर्नाटकात कोरोना पॉझीटीव्हची संख्या विचारात घेऊन संबधित प्रशासनाकडून राज्याबाहेर असलेल्या नागरिकांना गावी परत येण्याचा पास देण्याची सुविधा तात्पुरती बंद केली आहे. एसटी बसमधून सोमवारी (ता.18) काही कामगार कर्नाटकात आपल्या गावी जात होते. पण त्यांच्याकडे पास नसल्याने कोगनोळी नाक्‍यावरच कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. 

हे पण वाचा - तो कर्नाटकातला, ती महाराष्ट्रातली, लग्न करुन त्यांनी संसार थाटला पण...
 

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आपल्या गावी परतण्याची परवानगी बाबतचा ऑनलाईन पासची सुविधा कर्नाटक प्रशासनाने तात्पुरती बंद केली आहे. पास व्यतिरिक्त कोणालाही कर्नाटकात पाठवू नका अशी सूचना कर्नाटकातील जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केली. त्यामुळे किणी टोल नाक्‍यावर जिल्ह्याच्या सीमेवरून कर्नाटकात जाणाऱ्यांकडे जर पास नसेल तर त्यांना पुढे प्रवेश न देण्याची भूमिका जिल्हा पोलिसांना घ्यावी लागत आहे. 

हे पण वाचा -   दिलासादायक बातमी ; कोल्हापूर ऑरेंज झोनमध्येच
 

go to top