म्हणुन कोल्हापूर शहरात टँकरवर पाणी भरण्यासाठी महिलांची उडतेय झुंबड...

Women rush to fill water on tankers in Kolhapur city
Women rush to fill water on tankers in Kolhapur city
Updated on

कोल्हापूर - कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागदेववाडी उपसा केंद्र जवळील ट्रांसफार्मर जळाल्यामुळे निम्म्याहून अधिक शहरातील पाणीपुरवठा सलग तिसऱ्या दिवशी खंडित झाला आहे.त्यामुळे लॉक डाऊन असतानाही सोशल डिस्टन्सचा नियम मोडून टँकरवर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांपैकी बालिंगा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राला सोमवारी गळती लागली होती.ही गळती काढण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद होता. सोमवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरू होतो न होतो तोच मंगळवारी पहाटे नागदेवाडी उपसा केंद्रा जवळील ट्रांसफार्मर जळाल्यामुळे योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला. परिणामी पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला. गेली दोन दिवस ट्रांसफार्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे पण अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने सलग तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com