सरस्वती स्तवन रुपात श्री अंबाबाईची पूजा

Worship of Shri Ambabai as Saraswati hymn
Worship of Shri Ambabai as Saraswati hymn

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची अगस्तीकृत सरस्वती स्तवन रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. करवीर महात्म्य हा करवीरचे क्षेत्र महात्म्य सांगणारा ग्रंथ अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा यांच्या संवादातून उलगडतो.

श्री अंबाबाईची पालखी घाटी दरवाजा समोरील ज्या दीपमाळेला प्रदक्षिणा घालते तेथे या दोघांच्याही मूर्ती आहेत. अगस्ती ऋषींनी लोपामुद्रेसह करवीरच्या त्रिशक्तीचे दर्शन घेतल्यानंतर जी स्तुतिस्तोत्रे बाहेर पडली त्यातीलच हे एक स्तवन असल्याचे श्रीपूजक पराग ठाणेकर, योगेश जोशी यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने त्यांनी महाद्वार गेटपासूनच दर्शन घेतले.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com