पैलवानांचा हंगाम जाणार वाया; यंदाही यात्रांत कुस्त्यांचा शड्डु नाहीच

wrestling competition in festival canceled this year in kolhapur for coronawrestling competition in festival canceled this year in kolhapur for corona
wrestling competition in festival canceled this year in kolhapur for coronawrestling competition in festival canceled this year in kolhapur for corona
Updated on

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाला एक वर्ष झाले. वर्षभरात या महामारीमुळे यात्रा, जत्रा, उरूस रद्द झाले होते. यावर्षीही तीच 
परिस्थिती कायम आहे. परिणामी कुस्त्यांच्या जंगी फडात यंदाही पैलवानांचा शड्डू घुमणार नाही. यामुळे सर्वसामान्य पैलवानांचा हंगाम वाया गेला असून उपासमारीची वेळ आली आहे.
यावर्षी गावोगावच्या वार्षिक यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांच्या कालावधीत विविध गावांच्या यात्रा मोठ्या उत्साहात होतात. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यात्रांचे मुख्य आकर्षण दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा असतो. यात मोठ्या प्रमाणावर पैलवान सहभागी होतात. जिल्ह्याबरोबर सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव ते अगदी पंजाब, हरियानापासूनची पैलवान मंडळी जिल्ह्यात कुस्ती स्पर्धेसाठी दाखल होतात.यात पैलवानांना लाखोंची बक्षिसे दिली जातात. याच रकमेतून सर्वसामान्य मुले वर्षभराचा खुराक भागवतात. अनेक पैलवान आपला खर्चही भागवून घरखर्चातही आर्थिक हातभार लावतात. गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच लॉकडाऊन सुरू झाले आणि तो हंगामही 
वाया गेला. 

दिवाळीनंतर कोरोना प्रतिबंधक नियम  शिथिल झाल्याने कुस्तीची मैदाने भरु लागली होती. परंतु फेब्रुवारीपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावच्या यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे यंदाचा ही कुस्ती हंगाम झाला नाही तर कुस्तीचा सराव थांबवण्याचा अनेक मल्लांचा विचार आहे. दिवाळीपासून नव्या उमेदीने कुस्तीचा सराव पैलवानांनी सुरु केला.’महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली; परंतु कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्पर्धा नेमक्‍या कधी होणार आणि सराव कुठंपर्यंत करायचा? असा प्रश्न आहे. अनेक पालक कर्ज काढून मुलांना खुराकासाठी पैसे देत असल्याची स्थिती आहे.

"कुस्तीपटूंवर सध्या वाईट वेळ आहे. गेले वर्षही त्यांचे उत्पन्नाविना गेले. ग्रामस्थांनी कुस्तीच्या फडासाठीचा राखीव खर्च गावांतील पैलवानांसाठी करावा. गावांनी यात्रेसाठी होणाऱ्या खर्चातून त्या गावातील पैलवानांच्या खुराकावर खर्च भागवला तर पैलवान टिकून राहतील."

- विश्वास हारूगले, वस्ताद
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com