
कोल्हापूर : गुन्हेगारीसह अवैध धंद्यावर वचक आणि कोरोना संकट काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा पोलिस दलाची यंदा पुरस्काराची पाटी मात्र कोरीच राहिली. पोलिस दलात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्माचाऱ्यांची दखल घेऊन त्यांना "पदक' देऊन शाबासकीची थाप दिली जाते. यात शौर्य, राष्ट्रपती, पोलिस महासंचालक, उल्लेखनीय सेवा, अतुलनीय, गुणवत्ता पूर्ण सेवा आदी पथकांचा समावेश आहे.
दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पदके प्रदान केली जातात. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस दल अडीच वर्षांत धडाकेबाज कारवाई करत आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले भागातील संघटित गुन्हेगारांच्या मोकाअंतर्गत मुसक्या आवळल्या. यादवनगरातील मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवरच झालेल्या प्रतिहल्ल्याला मोकाअंतर्गत कारवाईद्वारे चोख उत्तर दिले. तब्बल 42 जणांवर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुगार, मटका अड्डयासह हातभट्ट्यांवर कारवाईची धडक मोहीम सुरूच ठेवली. मिरजमार्गे येणाऱ्या गांजा तस्करांचे रॅकेटचा पर्दाफाश केला. घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त केला. किणी टोल नाक्यावर विष्णोई टोळीशी जीवाची पर्वा न करता दोन हात केले.
15 जणांचे प्रस्ताव
जिल्हा पोलिस दलाची कारवाईची दखल गृह विभाने घेतली. महाराष्ट्रदिनी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्यासह 26 जणांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. स्वातंत्रदिनी जाहीर होणाऱ्या पुरस्कारासाठी जिल्हा प्रशासनाकडून 15 जणांचे प्रस्ताव पाठविले होते. यात अनेकांना पुरस्कार मिळतील, अशी शक्यता होती.
पुरस्कारासाठी यंदा पाठविले प्रस्ताव
*पाठविले प्रस्ताव - 15
*पोलिस अधिकारी - 3
*पोलिस कर्मचारी - 12
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.