साईट पट्टीने घेतला बळी ; भीषण अपघातात तरुण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

गणेशचे वडील शामराव पाटील हे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करतात

कुडित्रे (कोल्हापूर) - आमशी, बोलोली (ता. करवीर) येथे दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. गणेश शामराव पाटील (वय 22 रा. बोलोली पैकी दुर्गुळेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज (ता. २८) सकाळी सात वाजता घडली. घटनेची नोंद करावीर पोलिसात झाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशचे वडील शामराव पाटील हे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करतात. शेतीच्या कामानिमित्त ते गावाकडे आले होते. त्यांच्या बदल्यात गणेश हा ऊस तोडणीच्या कामासाठी आज दुचाकीवरून (नंबर एम एच 09 बि डी 7508 ) जात होता. पहाटे सात वाजता आमशी ते बोलोली दरम्यान एका उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना. गणेश रस्त्याच्या साईट पट्टी वरून गाडी  रस्त्यावर घेत होता. या वेळी गाडी स्लीप झाली आणि गणेश उसाने भरलेल्या ट्रॉली च्या चाकाखाली आला. ट्रॉली त्याच्या अंगावरून गेली नाही, मात्र ट्रॉलीबरोबर गणेश गाडीसह फरपडत गेला. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि तो जागीच ठार झाला. गणेश हा एकुलता एक मुलगा होता, गणेशच्या मृत्यूनंतर बोलोली बारा वाड्या परिसरात शोककळा पसरली आहे.

हे पण वाचाVideo -कोल्हापूरच्या जोडीचं रोमॅंटिक साँग होतंय व्हायरल

साईट पट्टीने घेतला तरुणाचा बळी

कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर व वाड्या-वस्त्यांवर रस्ते डांबरीकरण केल्यानंतर साईट पट्टीवर मुरूम टाकला जात नाही. कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर मोठ्या प्रमाणावर साईट पट्टीवरून गाडी स्लिप होऊन अपघात होत आहेत. याला कोण जबाबदार? असे प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy dead in accident at kolhapur kuditre