मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आली ऑफर अन् ठरला त्याचा अखेरचा दिवस 

young man case for bottle of liquor crime cases in kolhapur
young man case for bottle of liquor crime cases in kolhapur

नागाव (कोल्हापूर)  : आजकाल गुन्ह्याचे  प्रमाण तरूणांमध्ये वाढत आहे. यातून खूनाचे प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातच कोल्हापूर जिल्हयात एका २६ वर्षाच्या तरूणाचा खून  झाला. त्यातच काल नागावमध्ये एक घटना घडली. नशेतच आणखी दारूची बाटली मागितली म्हणून झालेल्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून झाला. अमित रमेश नाईक ऊर्फ राठोड (वय २१, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शिरोली येथील पंचगंगा नदीकाठावर असणाऱ्या दर्ग्याच्या मागील शेतात आज दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन यातील समीर नदाफ व योगशे साखरे (दोघेही रा. गांधीनगर)  या संशयितांना रात्री उशिरा  ताब्यात घेतले. 

याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : 

मृत अमित नाईक हा आई वडिलांसोबत शिरोली येथील माळवाडी भागात भाडोत्री घरात राहत होता. मुळचे विजापूर (कर्नाटक) भागातील असणारे नाईक कुटुंब हे बंजारा (लमाण) समातील आहे. त्यामुळे मोलमजूरी हाच त्यांचा व्यवसाय. पण अमित हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्रांसोबत नेहमी वावरायचा. यातूनच त्याचे आर्थिक देवाण-घेवाणीची व्यवहार होते. अशा आर्थिक व्यवहारातून काल रात्री व आज दुपारी त्याचे वाद झाल्याचे समजते. पण या वादावर पडदा टाकत त्याने मित्रांसोबत नशा पार्टी करण्यासाठी ऑफर केली. त्यानंतर चौघे दोन मोटरसायकलवरून दर्ग्याच्या मागे शेतात दारू पिऊन नशा करत बसले.

तेवढ्यात तेथे आणखी दोघे आले. त्यांनी त्यांच्यासोबत दारूची बाटली आणली होती. त्यांच्याकडे अमितने दारू मागितली. पण त्यांनी अमितला दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे अमितने शिवीगाळ करत त्याला थोबाडीत मारली. त्यामुळे नशेतच असलेल्या त्या युवकाने त्याला चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. यामुळे अमितच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव सूरू झाला. त्याच्याच एका मित्राने त्याला मोपेडवरून गांधीनगर फाटा येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, शिरोली एमआयडीसी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आणि दवाखान्यात धाव घेतली. अमितच्या सोबत असणाऱ्या मित्रांकडून चौकशी करत पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.करवीरचे उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com