तरुणींचे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ डिफेन्स गरजेचे...

Youth Self Awareness Self Defense Needed
Youth Self Awareness Self Defense Needed

कोल्हापूर - ‘‘सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळा आणि त्यातूनही काही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता आहे, असे जाणवताच स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा. पोलिसांशी तत्काळ संपर्क साधा. पोलिस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेतच. त्यामुळे घाबरून गोंधळून जाऊ नका. दक्ष व्हा, स्वसंरक्षणासाठी सज्ज राहा,’’ असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक व निर्भया पथकप्रमुख अनिता मेणकर यांनी केले. त्यांनी आज ‘सकाळ’ शहर कार्यालयात विद्यार्थिनींशी संवाद साधला. पोलिस प्रशासन व तरुणींत संवादाचा पूल बांधण्यासाठी ‘दामिनी व्हा’च्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी स्वागत केले.

अनिता मेणकर म्हणाल्या, ‘‘सावज शोधणारी प्रवृत्ती सध्या वाढत आहे. त्यामुळे तरूणी, महिलांनी वावरताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे. आपण कोणत्या परिसरात आहोत. आजुबाजुला कोणत्या व्यक्ती आहेत. त्यांचे वागणे - बोलणे कसे आहे, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. कोणतीही अनुचित घटना क्षणार्धात घडत नाही. ती घटना घडताना काही वेळ लागतो. या वेळेतच प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हा. अनुचित प्रकार घडत असतानाच पोलिस पोहचतीलच असे नाही. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी मिळणाऱ्या वेळेत प्रतिकार करा आणि त्वरीत पोलिसांशी संपर्क साधा.’’ यावेळी विद्यार्थिनींही मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजात वावरताना त्यांना येणाऱ्या अडचणी, अनुचित प्रकार घडत असल्यास प्रतिकार कसा करावा याबाबत त्यांनी प्रश्‍न विचारले. यावेळी निर्भया पथकाचे सूरज भोपळे, कोमल पाटील, सविता पाटील,अविनाश तारळेकर उपस्थित होते. या संवादात सायबर महाविद्यालयाच्या रागिणी दामणे, सोनाली मन्वार, नेहा जाधव, अंकिता जमदाडे, सई साळोखे, न्यू कॉलेजच्या वैष्णवी वरपे, मयुरी वरपे,  प्राजक्त लिगडे, प्रतीक्षा कुरणे, जयश्री हवालदार, ऐश्‍वर्या कांबळे, गोखले कॉलेजच्या मोहिनी देशमुख, रूपा हुरकन्नावर, राजाराम महाविद्यालयाच्या स्वाती सरगर, कोमल कामेरकर, हर्षदा परीट या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. 

तक्रारीसाठी पुढाकार घ्या...

छेडछाड, शेरेबाजी करणे अशा घटना घडतात. मात्र याबाबत तक्रारींचे प्रमाण नगण्य आहे. पालकांना सांगितले तर शिक्षण थांबवतील म्हणून तक्रारी दिल्या जात नाहीत. काहीवेळा आप्तस्वकीयांकडूनही तक्रार देण्यापासून रोखले जाते. त्यामुळे अशा प्रवृत्तींचे मनोबल वाढते. वेळीच तक्रार दिल्यास असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई होईल. याचा धडा समाजात निर्माण होईल. अशा घटना रोखण्यास मदत होईल. त्यामुळे तक्रारीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन मेणकर 
यांनी केले.

व्यक्त व्हा...

तरुणींची छेडछाड किंवा त्यांना त्रास देण्याचे प्रकार घडत असताना अनेक जण पाहत बसतात. शाळा, महाविद्यालये, कामाच्या ठिकाणी अशा होणाऱ्या छळाविषयी माहिती पाठवा. या प्रकाराला वाचा फोडण्याचे काम ‘सकाळ’ करेल. यात तुमची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल. पोलिसांच्या मदतीने न्याय देण्यासाठी पावले उचलली जातील, याकडे लक्ष ठेवले जाईल.  व्हॉट्‌सॲप क्रमांक : ९१४६१९०१९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com