वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अकलूज येथे होणार शंभर बेडचे कोविड सेंटर 

शशिकांत कडबाने
Tuesday, 4 August 2020

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, अकलूज व माळशिरस तालुक्‍यातील वाढती कोविड रूग्णांची संख्या लक्षात घेता येत्या काही दिवसांतच हे कोविड सेंटर उभारण्यात येईल. अकलूज हे मेडिकल हब म्हणून प्रसिध्द असून येथे अत्यावश्‍यक वैद्यकिय सेवेची सर्व साधने आणि तज्ञ डॉक्‍टरही उपलब्ध असल्याने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. माळशिरस तालुक्‍यात कोविड रूग्णांची संख्या 235 वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करून 90 रूग्ण घरी गेले आहेत तर 144 रुग्ण उपचार घेत आहेत. 

अकलूज(सोलापूर): येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या इमारतीमध्ये 100 बेडचे कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज अकलूज येथे आढावा बैठकीनंतर दिली. 

हेही वाचाः डॉक्‍टर व्हायचे होते, पण झालो आयपीएस; पंढरपूर तालुक्‍यातील अभयसिंह देशमुख यांचा प्रवास 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, अकलूज व माळशिरस तालुक्‍यातील वाढती कोविड रूग्णांची संख्या लक्षात घेता येत्या काही दिवसांतच हे कोविड सेंटर उभारण्यात येईल. अकलूज हे मेडिकल हब म्हणून प्रसिध्द असून येथे अत्यावश्‍यक वैद्यकिय सेवेची सर्व साधने आणि तज्ञ डॉक्‍टरही उपलब्ध असल्याने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. माळशिरस तालुक्‍यात कोविड रूग्णांची संख्या 235 वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करून 90 रूग्ण घरी गेले आहेत तर 144 रुग्ण उपचार घेत आहेत. 

हेही वाचाः बार्शी तालुक्‍यास पाचव्यांदा मानाचा तुरा ; चुंबचा अविनाश जाधवर झाला जिल्हाधिकारी 

कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी अकलूज शहरातील डॉक्‍टरांशी याबाबत चर्चा झाली असून खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले योजनेअंतर्गत उपचारासाठी 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शासकीय निकषाप्रमाणे खाजगी दवाखान्यांनी बिलाची आकारणी करावी. नियमाप्रमाणे बिल आकारणी होते कि नाही हे पाहण्यासाठी ऑडीटर नेमण्यात आले आहे. प्रत्येक बिल यावेळी तपासले जाईल. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवरत्नचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, आरोग्य विभागाचे जिल्हा अधिक्षक डॉ. भीमाशंकर जमादार, प्रांताधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्यासह डॉक्‍टर उपस्थित होते.  
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अकलूज येथे होणार शंभर बेडचे कोविड सेंटर