आशिर्वाद वृक्ष उपक्रमात बार्शी शहरात लावली 104 देशी वाणांची रोपटी 

प्रशांत काळे
Wednesday, 16 September 2020

राज्यभरात समितीच्या वतीने 1000 आशिर्वाद वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून समितीच्या वसतिगृहाचे आजी-माजी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सोलापूर विभागामधील बार्शी येथे 104 देशी वृक्ष लोखंडी सुरक्षा जाळीसह वितरण कार्यक्रम पार पडला. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र नामजोशी यांच्या प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ देणगी रूपात लाभलेल्या 4 आशीर्वाद वृक्षांचे प्रातिनिधिक रोपण नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

बार्शी(सोलापूर) ः माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे (वसतिगृह) यांच्या वतीने बार्शी शहरात 104 देशी वृक्ष लोखंडी जाळीसह वितरीत केले असून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. समितीचा हा उपक्रम तालुक्‍याच्या हरित बार्शी संकल्पनेच्या वैभवामध्ये भर टाकणारा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी केले. 

हेही वाचाः बार्शी तालुक्‍यात 83 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; दोघांचा मृत्यू 

राज्यभरात समितीच्या वतीने 1000 आशिर्वाद वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून समितीच्या वसतिगृहाचे आजी-माजी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सोलापूर विभागामधील बार्शी येथे 104 देशी वृक्ष लोखंडी सुरक्षा जाळीसह वितरण कार्यक्रम पार पडला. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र नामजोशी यांच्या प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ देणगी रूपात लाभलेल्या 4 आशीर्वाद वृक्षांचे प्रातिनिधिक रोपण नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

हेही वाचाः कांदा निर्यात बंदी विरोधात शहरात कॉंग्रेसची जोरदार निदर्शने 

यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. जे. देशमुख, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत देशमुख, बार्शी वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, बार्शी वृक्षसंवर्धन समितीचे अतुल पांडे, सचिन शिंदे तसेच पुणे येथील विद्यार्थी सहाय्यक समिती वसतिगृहाचे विद्यार्थी समर्थ देशमुख, कृष्णा देवकर, गोपाळ माळी, पालक व नागरिक उपस्थित होते. प्रास्तविक माजी विद्यार्थी प्रशांत आवटे यांनी तर आभार समर्थ देशमुखने मानले. 
प्रदीप तळवलकर यांनी 50 आशीर्वाद वृक्षांसाठी एक लाख 5 हजार रुपयांची देणगी दिली. सोलापूर विभागात वाटप झालेल्या आशीर्वाद वृक्षांमध्ये समितीचे कार्यकर्ते प्रदीप मांडके, सुनीता गद्रे आदी अनेक पर्यावरण प्रेमी देणगीदारांचा मोलाचा वाटा होता.  
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 104 native varieties planted in Barshi city under Ashirwad Tree initiative