माळशिरस तालुक्‍यात नीरा कालव्यावर 108 सहकारी पाणी वाटप संस्था होणार सुरू

 माळशिरस तालुक्‍यात नीरा कालव्यावर 108 सहकारी पाणी वाटप संस्था होणार सुरू

अकलूज(सोलापूर)ः माळशिरस तालुक्‍यात नीरा कालव्यावर 108 सहकारी पाणी वाटप संस्था सुरु केल्या जाणार आहेत. या संस्थाच्या मदतीने शेतकऱ्यांना सुयोग्य पध्दतीेने सिंचनाचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. 

येथील सहकार महर्षी कारखान्याच्या उदय सभागृहात तालुक्‍यातील सहकारी पाणी वाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बोलाविली होती. यावेळी कार्यकारी अभियंता संजय बोडके, उपअभियंता अमोल मसकर ,श्रीरंग ठवरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख , माळशिरसचे उपनगराध्यक्ष डॉ. मारुती पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, मामासाहेब पांढरे , ऍड. प्रकाश पाटील यांच्यासह जलसंपदा खात्याचे व शेती महामंडळाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. 

माळशिरस तालुक्‍यात नीरा कालव्यांवर 108 सहकारी पाणी वाटप संस्था सुरु करणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी पाणी मोजमाप करणाऱ्या कुंड्या बांधण्याची व चाऱ्या दुरुस्त करण्याची गरज लक्षात घेत आ.मोहिते पाटील तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपूरवठा केला होता. जलसंपदा मंत्र्यांनी या कामासाठी 89 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतू कुंड्या बांधन्याचे काम थंडावले होते. ते काम तातडीने सुरु करा अशी सूचना आ. मोहिते पाटील यांनी दिली. 
शेती महामंडळाकडील जमिनी काही भांडवलदार भाडेतत्वावर कसत आहेत. त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यांना किती एकराची परवानगी आहे व ते किती एकरासाठी पाणी वापरतात याची चौकशी करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे आ. मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले. 
नीरा उजव्या कालव्याची वहन क्षमता 1550 क्‍युसेक्‍स असून सध्या सुरु असलेली स्ट्रक्‍चरची कामे येत्या दोन वर्षात पुर्ण होतील. त्यानंतर कालव्याची वहन क्षमता 1950 क्‍युसेक्‍स होइल त्यानंतरच सर्व शाखांतील कालव्या मधून एकाच वेळी टेल टु हेड या निकषाप्रमाणे पाणी सोडता येइल अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय बोडके यांनी दिली. 

पाणी मोजमापन कुंड्या बांधाव्यात 
माळशिरस तालुक्‍यात नीरा कालव्यांवर पाणी मोजमापन कुंड्या बांधणे,चाऱ्या दुरुस्ती करणे आदि कामे तत्काळ करावीत 
- आ.रणजितसिंह मोहिते पाटील 

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com