अबब..! नागाची तब्बल 22 पिल्ले एकाच ठिकाणी सापडली; कोठे? वाचा... 

विजयकुमार कन्हेरे 
Wednesday, 15 July 2020

कुर्डू येथील शेतकरी भीमराव राऊत यांच्या घरासमोर कडब्याची मोठी गंज उभी केलेली आहे. दुपारच्या सुमारास कडबा काढताना लाकडाच्या फळीखाली राऊत यांना नागाचे पिल्लू दिसले. त्यांनी लगेच कुर्डुवाडी येथील सर्पमित्र राहुल अस्वरे यांच्याशी संपर्क साधला. श्री. अस्वरे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व जमिनीलगत असलेल्या नऊ पिल्लांना सुरक्षितपणे पकडले. नंतर गंजीचा काही भाग काढून सुमारे तीन फूट खड्डा खणून जमिनीखालील नागाची पिल्ले बाहेर काढली. एकूण 22 पिल्ले या वेळी त्यांनी पकडली.

कुर्डुवाडी : कुर्डू (ता. माढा) येथील एका शेतकऱ्याच्या घरासमोरील कडब्याच्या गंजीखाली नागाची तब्बल 22 पिल्ले सापडली. या सर्व पिल्लांना सर्पमित्र राहुल अस्वरे यांनी सुरक्षितपणे पकडून वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून, उद्या त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात येणार आहे. 

हेही वाचा : लॉकडाउनविरुद्ध 18 जुलै रोजी करा घरोघरी निषेध : कोणी केले आवाहन? वाचा... 

कुर्डू येथील शेतकरी भीमराव राऊत यांच्या घरासमोर कडब्याची मोठी गंज उभी केलेली आहे. दुपारच्या सुमारास कडबा काढताना लाकडाच्या फळीखाली राऊत यांना नागाचे पिल्लू दिसले. त्यांनी लगेच कुर्डुवाडी येथील सर्पमित्र राहुल अस्वरे यांच्याशी संपर्क साधला. श्री. अस्वरे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व जमिनीलगत असलेल्या नऊ पिल्लांना सुरक्षितपणे पकडले. नंतर गंजीचा काही भाग काढून सुमारे तीन फूट खड्डा खणून जमिनीखालील नागाची पिल्ले बाहेर काढली. एकूण 22 पिल्ले या वेळी त्यांनी पकडली. यासाठी त्यांना सुमीत मस्के यांनी सहकार्य केले. त्यांनी वनरक्षक सुरेश कुर्ले यांच्याशी संपर्क साधला. त्या पिल्लांना बुधवारी निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षितपणे सोडले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण होणार ज्या-त्या गावातच 

याबाबत सर्पमित्र राहुल अस्वरे म्हणाले, गेल्या 12 वर्षांपासून मी रहिवासी भागातील साप किंवा नाग पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडत आहे. परंतु इतक्‍या वर्षांच्या माझ्या कामात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने नागाची पिल्ले पकडली आहेत. ही पिल्ले साधारणपणे दीड ते दोन महिन्यांची आहेत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप दिसून आल्यास त्याला मारू नका. सर्पमित्रांना संपर्क साधा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 baby cobras caught in a field in Kurdu