पंढरपूर शहर-ग्रामीणमध्ये आज आढळले 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

अभय जोशी 
बुधवार, 15 जुलै 2020

आज (बुधवारी) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, शहर व तालुक्‍यातील मिळून 20 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ती पाच (करकंब, गोपाळपूर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक) तर जगदंबानगर टाकळी येथे नवीन लक्षणे असलेला रुग्ण सापडला आहे. शहरामध्ये एकूण 14 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 संपर्क व्यक्ती तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : आज पंढरपूरमध्ये ग्रामीण भागात सहा तर शहरामध्ये तब्बल 14 असे एकूण 20 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. 

हेही वाचा : बार्शीत तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच; मंगळवारी आढळले 16 रुग्ण, एकूण संख्या 213 

आज (बुधवारी) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, शहर व तालुक्‍यातील मिळून 20 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ती पाच (करकंब, गोपाळपूर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक) तर जगदंबानगर टाकळी येथे नवीन लक्षणे असलेला रुग्ण सापडला आहे. शहरामध्ये एकूण 14 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 संपर्क व्यक्ती तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण आहे. महापूर चाळ, संत पेठमधील पाच, बागवान गल्ली सांगोला रोड येथील तीन, ज्ञानेश्वर नगरमधील दोन तर 
गांधी रोड, संत पेठ, घोंगडे गल्ली, शांतीनगर, लिंक रोड येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली आहे. 

हेही वाचा : अबब..! नागाची 22 पिल्ले एकाच ठिकाणी सापडली; कोठे? वाचा... 

पंढरपूर शहर व तालुक्‍यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून तातडीने आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले आणि मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 corona positive patients found today in Pandharpur city-rural