
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना मुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण मधील आठ व महापालिका हद्दीतील चार जणांचा त्यामध्ये समावेश आहे. सोलापूर शहरातील 511 व ग्रामीण भागातील 787 अशा एकूण 1 हजार 298 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजचा अहवालानुसार नव्या 171 बाधितांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. ग्रामीण भागातील 140 व महापालिका हद्दीतील 31 नव्या बाधितांचा समावेश आहे. आज एकाच दिवशी 333 कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 289 व महापालिका हद्दीतील 44 जणांचा समावेश आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 31 हजार 307 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आता नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. आतापर्यंत 37 हजार 533 जण बाधित झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 28 हजार 395 तर महापालिका हद्दीतील नऊ हजार 138 बाधित यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 86 अहवाल प्रलंबित आहेत हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.
रुग्णालयात 4928 ऍक्टिव्ह कोरोना बाधित
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सध्या रुग्णालयात 4 हजार 928 ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 4 हजार 194 तर महापालिका हद्दीतील 734 रुग्णांचा समावेश आहे.
शहरात कमी होऊ लागला कोरोनाचा संसर्ग
शहरातील 56 वर्षांवरील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 511 झाली आहे. 606 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 31 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. शहरातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. मात्र, को- मॉर्बिड रुग्ण अद्यापही कोरोनाचे बळी ठरत असून 56 वर्षांवरील चौघांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आज राघवेंद्र नगर, कित्तूर चनम्मा नगर (सैफूल), कुर्बान हुसेन नगर, अनुविश्व सोसायटी, सुशिल नगर, एसआरपी कॅम्पजवळ (विजयपूर रोड), इंदिरा नगर, बजरंग नगर (होटगी रोड), मिरा नगर, जुळे सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर, द्वारका नगरी, कविता नगर, पद्मा नगर, अवसे वस्ती (आंबराई), गीता नगर, हिरा मोती टॉवर, खड्डा तालिमजवळ (पाच्छा पेठ), धोंडीबा वस्ती, शिवाजी चौक, ऍपेक्स हॉस्पिटलजवळ, शंकर नगर (होटगी रोड), पी. जी. हॉस्टेल, देशमुख- पाटील वस्ती (देगाव नाका), हुच्चेश्वर नगर, विद्या नगर (शेळगी) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात आज न्यू पाच्छा पेठेतीलल खड्डा तालिमजवळील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला गळा कापलेल्या आवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर रेल्वे लाईन्स परिसरातील 77 वर्षीय पुरुष, जुळे सोलापुरातील भारती विद्यापीठाजवळील 78 वर्षीय पुरुषाचा आणि मंत्री चंडक नगरातील 63 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-
ठळक बाबी...
- शहरातील 86 हजार 520 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
- आतापर्यंत शहरातील पाच हजार 380 पुरुषांना तर तीन हजार 758 महिलांना कोरोनाची बाधा
- शहरातील 340 पुरुष आणि 171 महिलांचा कोरोनामुळे झाला मृत्यू
- आतापर्यंत शहरातील सात हजार 893 रुग्णांनी केली कोरोनावर मात
- आज शहरात चारजणांचा मृत्यू तर 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
- शहरात सध्या 101 संशयित होम क्वारंटाईनमध्ये तर 95 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये
सोलापूर जिल्ह्यात 140 कोरोना बाधित
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 2 हजार 376 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 236 अहवाल निगेटिव्ह आले असून 140 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार 289 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 28 हजार 395 झाली आहे. रुग्णालयात सध्या 4 हजार 194 रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 787 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 23 हजार 414 कोरोना मुक्त झाले आहेत. आजचा अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील 75 वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथील 68 वर्षीय महिला, बार्शी तालुक्यातील ढोराळे येथील 78 वर्षीय पुरुष, करमाळा तालुक्यातील उंबरड येथील 70 वर्षीय पुरुष, करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील 85 वर्षिय पुरुष, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील साठ वर्षीय महिला, माढा तालुक्यातील मोडनिंब येथील 52 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्यातील औंढी येथील 44 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना चाचण्यांचे अद्यापही 86 अहवाल प्रलंबित आहेत.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या. कंसातील आकडेवारी मृतांची
अक्कलकोट : 1052 (63), बार्शी : 5117 (166), करमाळा : 1986 (44), माढा : 2895 (92), माळशिरस : 4813 (93), मंगळवेढा : 1321 (30), मोहोळ : 1259 (67), उत्तर सोलापूर : 708 (31), पंढरपूर : 5646 (132), सांगोला : 2222 (29), दक्षिण सोलापूर : 1376 (40), एकूण : 28395 (787)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.