आपण साखर कारखाना काढणार आहे.... 

अभय जोशी
मंगळवार, 3 मार्च 2020

पंढरपूर (सोलापूर) : आपण खासगी साखर कारखाना काढणार आहे. या कारखान्याच्या संचालकपदी नियुक्ती करतो, असे सांगून एकाने पंढरपूर शहर व तालुक्यातील १२ जणांची तब्बल २४ लाख ६९ हजार १०० रुपयांची फसवणूक केली.

पंढरपूर (सोलापूर) : आपण खासगी साखर कारखाना काढणार आहे. या कारखान्याच्या संचालकपदी नियुक्ती करतो, असे सांगून एकाने पंढरपूर शहर व तालुक्यातील १२ जणांची तब्बल २४ लाख ६९ हजार १०० रुपयांची फसवणूक केली.
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संशयित आरोपी शाम हब्बू राठोड (रा. पूणे. सध्या सोलापूर (विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर येथे अटक) याने आपण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे इचलकरंजी पंढरपूर रस्त्यावर श्री तिरूपती बालाजी सहकारी साखर कारखाना प्रा. ली या नावाने साखर कारखाना काढणार आहे. या साखर कारखान्यावर तुमची संचालकपदी नियुक्ती करतो.  त्यासाठी आपणाकडील पाच खातेदार व त्यांचे बायोडेटा कागदपत्र दया, असे सांगितले.
याशिवाय संशयित आरोपीने फिर्यादी उध्दव गोवर्धन कौलगे (वय ५० वर्षे,  धंदा- शेती, रा- पिराची कुरोली तालुका पंढरपूर) यांना एक टक्का रक्कम भरल्या नंतर रक्कमेच्या शंभर पट कर्ज देतो, असे पटवून देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. 
दरम्यान १५ ऑक्टोबर २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यानच्या काळात साखर कारखान्याच्या संचालक पदी नियुक्ती होईल या आशेने उध्दव गोवर्धन कौलगे यांनी ४ लाख ३४ हजार, दिपकगिर नंदलालगिर गोसावी यांनी ४ लाख ८५ हजार, अनिल श्रीमंत जाधव यांनी ३ लाख ४१ हजार, उल्हास दगडु ढेरे यांनी २ लाख ९१ हजार, वसंत ईश्वर रूपनर यांनी २ लाख ९१ हजार तर परमेश्वर किसन सरगर,  कैलास मुकुंद करंडे, महादेव संदिपान कवडे , बाळासाहेब दादासाहेब कदम, सोनप्पा भिमाशंकर भागानगरे, आप्पासाहेब दुर्योधन भोईरकर अशा सहा जणांनी प्रत्येकी ९७ हजार आणि साधना मनोज सुधाकर कासेगावकर यांनी ४५ हजार असे एकूण मिळून २४ लाख ६९ हजार १०० रुपये आरोपीस दिले. परंतु आरोपीने त्यांची साखर कारखान्यावर संचालक पदी नियुक्ती न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 person frauded in Pandharpur taluka