मोठी बातमी ! महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनने केली पीपीई कीटची मागणी

तात्या लांडगे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या धर्तीवर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्‍टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट उपलब्ध करुन द्यावेत, त्याचे पैसे आम्ही देऊ अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी पब्लिक हेल्थ विभागाला कळविली आहे.
- डॉ. कुलदिप कोहली, संचालक, आयुष

सोलापूर : दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्‍टरांची सुरक्षितता महत्वाची असून खबरदारी म्हणून दिड लाख डॉक्‍टर्सना पीपीई कीट उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केली आहे. मात्र, त्यांना अद्यापही कीट उपलब्ध न झाल्याने बहूतांश डॉक्‍टरांनी दवाखाने बंदच ठेवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही नक्‍की वाचा :

aschim-maharashtra-news/solapur/upcoming-academic-year-will-start-after-july-277851">सकाळ ब्रेकिंग ! जुलैनंतर सुरु होणार आगामी शैक्षणिक वर्ष

कोरोनाच्या विषाणूचे संकट हद्दपार करण्यासाठी सद्यस्थितीत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सुमारे एक लाख डॉक्‍टर्स सेवा बजावत आहेत. मात्र, खबरदारी म्हणून भविष्यात डॉक्‍टर्स कमी पडू नयेत, या हेतूने आता आयुष विभागाच्या एक लाख डॉक्‍टर्सना प्रशिक्षित केले जाणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील बहूतांश खासगी दवाखाने कोरोनाच्या भितीने अद्यापही बंदच असून त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होऊ लागल्याचे चित्र आहे. कोणता रुग्ण कोरोना संशयीत तथा कोरोनाबाधित आहे, हे प्रथमदर्शनी ओळखता येत नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने पीपीई (वैयक्‍तिक सुरक्षिततेचे उपकरण) कीट उपलब्ध करुन द्यावेत, असे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन असोसिएशनने पत्रात नमूद केले आहे. मात्र, केंद्र सरकारकडे मागणी केलेले कीट मिळाले नसल्याने त्यांना आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

हेही नक्‍की वाचा : लॉकडाउन वाढणार ! एमपीएससीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या धर्तीवर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्‍टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट उपलब्ध करुन द्यावेत, त्याचे पैसे आम्ही देऊ अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी पब्लिक हेल्थ विभागाला कळविली आहे.
- डॉ. कुलदिप कोहली, संचालक, आयुष

हेही नक्‍की वाचा : नोटाबंदी झाली की काय ! लॉकडाउनच्या काळातही नागरिकांच्या बॅंकांबाहेर रांगा

राज्यात पीपीई कीटचा तुटवडा
डॉक्‍टर्स, नर्सेस आणि क्वारंन्टाईनमधील व्यक्‍तींना पीपीई कीटची गरज भासते. पीपीई कीटचा वापर एकदाच होतो, वापर केलेले कीट जाळून टाकावे लागते. राज्यातील 30 संस्था कोविड-19 चे उपचार करीत असून त्यांच्याकडे 30 हजार कीट उपलब्ध आहेत. तीन महिन्यांपर्यंत पुरतील इतके 65 हजार पीपीई कीट राज्यात उपलब्ध होते. आता त्याची आणखी गरज लागणार असून तशी मागणी कळविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.5 Lakh PPE kit is not available to doctors and staff