लॉकडाऊनच्या काळात 161 साप पकडले 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउन काळात कोणाचेही लक्ष नसल्याचा गैरफायदा घेऊन शहर परिसरात शिकाऱ्यांनी प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार केले. अशी एकूण सहा प्रकरणे उघडकीस आणली. कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) काळवीट व सशांची शिकार करण्यासाठी काही लोकांनी जाळे लावले. मात्र निसर्गमीत्रांनी व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी हे जाळे ताब्यात घेतले.

सोलापूर : सर्वत्र कोरोनाचे संकटात कुणीही घराबाहेर पडण्यास धजत नसताना केवळ पशूपक्ष्यावरील आलेले पाण्याचे व शिकारीचे संकट ओळखत मांजऱ्या, कोब्रासह तब्बल 161 साप पकडले आहेत. 

हेही वाचा : हक्काची कमाई गेल्याने पदरी निराशा 

कोरोनाच्या संकटात प्रत्येक जण काळजीत पडला आहे. शहर परिसरात लॉकडाउन काळात वाहतूक व जंगल परिसरात कोणीही न फिरकल्याने सापासह अनेक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यापैकी अनेक प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आले होते. या प्राण्यांची सुटका येथील निसर्गमित्रांनी केली आहे. 
अनेक साप नागरी वस्तीत शहरात आढळत होते. नागरिकांनी सुचना देताच निसर्गमीत्र स्वतः जाऊन या सापांना पकडत होते. नंतर हे साप नैसर्गीक अधिवासात सोडण्ण्याचे काम केले गेले. तेव्हा त्यांना त्यात विषारी सापांची संख्या 51 एवढी होती. 105 बिनविषारी साप पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले. तसेच पाच निमविषारी सापांचा त्यात समावेश होता. मांजऱ्या नावाचा दुर्मिळ साप देखील पहिल्यांदाच पाहण्यास आला. 

हेही वाचा : आंब्याचा इतीहास माहित नाही तर हे वाचाच 

लॉकडाउन काळात कोणाचेही लक्ष नसल्याचा गैरफायदा घेऊन शहर परिसरात शिकाऱ्यांनी प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार केले. अशी एकूण सहा प्रकरणे उघडकीस आणली. कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) काळवीट व सशांची शिकार करण्यासाठी काही लोकांनी जाळे लावले. मात्र निसर्गमीत्रांनी व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी हे जाळे ताब्यात घेतले. अक्कलकोट भागात उडगी भागात हरीण, काळवीट, मोरे, ससा, घोरपड, भुरली, कोल्हा आदी प्राण्याची शिकार करण्याचे प्रयत्न झाले. हे प्रयत्न उधळून लावले. सातदूधनी परिसरात शिकारीचे प्रकार या निसर्गमीत्रांनी उघडकीस आणले. 
शहरात रानमांजर, कोल्हा, हरिण व ससे आदी प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पकडून वनक्षेत्रात सोडले. घुबड, घार, तांबट, ऊली नेक स्टोर्क, शिक्रा व पोपट आदी 25 पक्ष्यांची सुटका केली. एका जखमी कोल्ह्यावर उपचार करून तो बरा झाल्यानंतर त्यास जंगलात सोडण्यात आले. 
मोहिमेत निसर्गमित्र परमेश्‍वर पाटील, शिवानंद हिरेमठ, फाय्याज शेख, अजित चव्हाण, सुरेश (दाजी) क्षीरसागर, सागर अष्टेकर, संतोष धाकपाडे, अजय हिरेमठ, विनय गोटे, पंकज चिंदरकर, भारत छेडा, श्रीकांत बडवे, धनंजय काकडे, पप्पू जमादार, राजकुमार कोळी, तरुण जोशी, प्रदीप कदम, संतोष मोरे, विजय येलगंटी, अकबर शेख, वेदांत कोंडेवार, शुभम कोंडेवार, सुशांत कुलकर्णी व कृष्णा थोरात यांनी सहभाग घेतला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 161 snakes were caught during the lockdown