अबब...! दोन दिवसांत ग्रामीणमध्ये 618 रुग्ण; 18 जणांचा मृत्यू 

2Corona_20Sakal_20times_4 - Copy.jpg
2Corona_20Sakal_20times_4 - Copy.jpg

सोलापूर : ग्रामीण भागात शनिवारी 311 तर रविवारी (ता. 9) 371 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या पाच हजार 1557 वर पोहचली आहे. दुसरीकडे दोन दिवसांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 162 झाली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आणि रॅपिड ऍन्टीजेन टेस्टला सुरुवात केल्यापासून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागली आहे. दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे रुग्णांची भर पडत असल्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे. 

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 42 हजार 775 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 11 तालुक्‍यांमध्ये सापडले पाच हजार 557 रुग्ण 
  • ग्रामीण भागातील 162 रुग्णांचा झाला मृत्यू; तीन हजार 160 रुग्णांची कोरोनावर मात 
  • अक्‍कलकोट 551, बार्शी एक हजार 148, करमाळा 237, माढा 411, माळशिरस 422, मंगळवेढा 190, मोहोळ 347, उत्तर सोलापूर 399, पंढरपूर 961, सांगोला 176 आणि दक्षिण सोलापुरात सापडले 715 रुग्ण 
  •  

अक्‍कलकोटमधील कर्जाळ, कुरनूर, मैंदर्गी, नन्हेगाव, स्टेशन रोड, बार्शीतील बगले रोड, बारंगुळे प्लॉट, व्ही.के.मार्टमागे, भवानी पेठ, भोसले चौक, चाटे गल्ली, दत्त नगर, धर्माधिकारी प्लॉट, खामगाव, नागणे प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, एसटी स्टॅण्डजवळ, पिंपरी आर., राऊत गल्ली, सनगर गल्ली, शेलगाव, सौंदरे, स्वराज कॉलनी, ताडसौंदणे, उपळाई रोड, वैराग, येडाई विहिरीजवळ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. करमाळ्यातील अण्णासाहेब प्रशालेजवळ, देवीचा माळ, घोलप नगर, कानड गल्ली, कसाब गल्ली, खडकपुरा, महेंद्र नगर, मंगळवार पेठ, मौलाली माळ, एमएसईबीजवळ, पिंपळवाडी, सहारा नगर, साठे नगर, वांगी क्र. तीन, तर माढ्यातील अकुलगाव, अण्णाभाऊ साठे नगर, भोसरे, दारफळ, कुर्डू, कुर्डूवाडी, लऊळ, कुटे प्लॉट, मानेगाव, म्हैसगाव, मोडनिंब, निमगाव, रांझणी, शुक्रवार पेठ, टेंभूर्णी, माळशिरसमधील अकलूज, बागेवाडी, बोरगाव, चाकोरे, गाडगे गल्ली, कन्हेर, खुडूस, महाळुंग, मेडद, पळसमंडळ, श्रीपूर आणि मंगळवेढ्यातील आदर्श नगर, डोंगरगाव, हुलजंती, कारखाना रोड, सप्तश्रुंगी नगर, मोहोळमधील अनगर, खंडाळी, कुरुल, मिरी, पाटकूल, सोहाळे येथेही नवे रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील अकोलेकाटी, गावडी दारफळ, हगलूर, हिरज, कळमण, वडाळा, पंढरपुरातील आढीव, भक्‍तीमार्ग, भोसे, चंद्रभागा घाट, डाळे गल्ली, धोंडेवाडी, डोंबे गल्ली, गजानन नगर, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गोविंदपुरा, हरिदास वेस, हरी हरी रेसिडेन्सी, ईसबावी, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, कर्मयोगी नगर, काशी कापड गल्ली, खर्डी, खेड भाळवणी, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, मनिषा नगर, मुंढेवाडी, नामदेव मंदिराजवळ, बॅंक ऑफ बडोदाजवळ, ओझेवाडी, परदेशी नगर, पुजारी सिटी, राऊळ गल्ली, संभाजी चौक, संत पेठ, सावरकर नगर, शासकीय वसाहत, स्टेशन रोड, उमदे गल्ली, वाखरी येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सांगोल्यातील महूद, हणमंतगाव, नवी पेठ, कोळा, वासूद येथै तर दक्षिण सोलापुरातील दोड्डी, ग्रील कंपनीजवळ, हत्तूर, हिपळे, मंद्रूप, नवीन विडी घरकूल, तिल्हेहाळ येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com