सकाळ ब्रेकिंग ! विद्यार्थ्यांना द्यावी लागणार तीन सत्रात परीक्षा

academic-tests.jpg
academic-tests.jpg
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे यंदाचे अंतिम टप्प्यात आलेले शैक्षणिक वर्ष अडचणीत सापडले. विद्यापीठांकडून अंतिम सत्राच्या परीक्षांचे नियोजन केले, मात्र लॉकडाउनमुळे ते रद्द करावे लागले. आता 14 एप्रिलला लॉकडाउन संपल्यानंतर 27 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी केले आहे. 70 दिवसांची परीक्षा आता 30 दिवसांत उरकली जाणार असून 20 दिवसांत निकाल लावला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या सत्रात परीक्षा द्याव्या लागणार आहेत. 


शैक्षणिक वर्षातील अंतिम परीक्षा 17 ते 20 मार्चपासून घेण्याचे नियोजन सोलापूर, पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच विद्यापीठांनी केले होते. मात्र, कोरोना या विषाणूचा विळखा वाढू लागल्याने विद्यापीठ प्रशासनाला परीक्षांचे नियोजन रद्द करावे लागले. 31 मार्चपर्यंतचा लॉकडाउन आता 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला. लॉकडाउन संपल्यानंतर परीक्षांचे फेरनियोजन करण्यात आले, परंतु त्याचा कालावधी वाढल्यास परीक्षा होतील की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषदांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील, असे विद्यापीठांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक व व्यावसायिक परीक्षांचे नियोजन स्वतंत्रपणे केले जाते. मात्र, आता दोन्ही परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. 


आगामी शैक्षिणक वर्ष महिनाभर लांबणार 
राज्यातील विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच महाविद्यालयांच्या परीक्षा आता लॉकडाउनमध्ये अडकल्या आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर परीक्षांचे नियोजन केले, परंतु परीक्षा घेणे, निकाल लावणे, प्रवेश प्रक्रिया यासाठी किमान दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे 15 जूनपासून सुरु होणारे आगामी शैक्षणिक वर्ष 15 जुलैनंतर सुरु होईल, असेही विद्यापीठांकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या निकालासाठी किमान 30 ते 40 दिवसांत लागतात. मात्र, परिस्थिती पाहून निकाल 20 दिवसांत लावण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. 


महाविद्यालयांनी घ्याव्यात प्रात्यक्षिक परीक्षा 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 108 महाविद्यालये असून राज्यातील अन्य विद्यापीठाअंतर्गत तब्बल साडेपाच हजार महाविद्यालये अंतर्भूत आहेत. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा विद्यापीठामार्फत घेतल्या जातात. मात्र, आता या परीक्षा महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घ्याव्यात, असे नियोजन विद्यापीठांनी केले आहे. परंतु, त्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार असून 13 एप्रिलला सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. 


25 जूनपर्यंत निकाल जाहीर होतील 
कोरोनाचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपल्यानंतर 27 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन असून 30 दिवसांत तीन सत्रात परीक्षा संपविल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर 20 दिवसांत निकाल जाहीर करुन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचेही नियोजन आहे. तर व्यावसायिक व शैक्षणिक दोन्ही विभागाच्या परीक्षा एकाचेवळी होणार असून प्रात्यक्षिक परीक्षेचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठरेल. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Solapur Political News
Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com