"या' जिल्ह्यातील 66 हजार शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज; "इतक्‍या' कोटींचे झाले वाटप 

संतोष सिरसट 
Wednesday, 5 August 2020

जिल्हाधिकारी म्हणाले, 1 जून ते 3 ऑगस्टपर्यंत 322.9 मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत 155.5 टक्के इतका आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये तीन लाख 59 हजार 294 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या 153 टक्के पेरणी झाली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत दोन लाख 68 हजार 542 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील एकूण संरक्षित रक्कम 501.82 कोटी रुपये असून यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा 10.27 कोटी रुपयांचा आहे. सर्वांत जास्त बार्शी तालुक्‍यातील एक लाख 18 हजार 318 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर : जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1438 कोटी 52 लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 984 कोटी 15 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण 66 हजार 151 खातेदारांना हे वाटप झाले आहे. त्याची टक्केवारी 68.41 टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

हेही वाचा : "कॅडबरी', "नॅशनल कॅश रजिस्टर'सारखी रचना होती नजरेसमोर... त्यातूनच आली किर्लोस्करवाडी जन्माला 

जिल्हाधिकारी म्हणाले, 1 जून ते 3 ऑगस्टपर्यंत 322.9 मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत 155.5 टक्के इतका आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये तीन लाख 59 हजार 294 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या 153 टक्के पेरणी झाली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत दोन लाख 68 हजार 542 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील एकूण संरक्षित रक्कम 501.82 कोटी रुपये असून यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा 10.27 कोटी रुपयांचा आहे. सर्वांत जास्त बार्शी तालुक्‍यातील एक लाख 18 हजार 318 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : केवळ "या' कारणाने एक्‍स्पोर्टर बनले मजूर! परिणामी चीन बांगलादेशाचा घेतो तसा "या' शहराचा फायदा घेतात "ही' राज्ये 

सोयाबीन बियाणे उगवणीसंदर्भात सात तालुक्‍यांतून 510 तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रार निवारण समितीने 455 तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली असता 191 तक्रारींमध्ये बियाण्यांत दोष आढळून आला. त्यापैकी शेतकऱ्यांना सहा क्विंटल बियाणे बदलून दिले. 52 शेतकऱ्यांना दोन लाख 35 हजार 135 रुपये कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात आली. निकृष्ट बियाणांसंदर्भात ग्रीन गोल्ड कंपनीवर वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाबीज, यशोदा सीड्‌स व दप्तरी सीड्‌स कंपन्यांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे. बनावट व निकृष्ट खताबाबत करमाळा पोलिस ठाण्यात दोन तर मोहोळ पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 984 crore crop loan was distributed to 66 thousand farmers in Solapur district