टेंभूर्णी-अहमदनगर रस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक 

टेंभूर्णी-अहमदनगर रस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक 

करमाळा (सोलापूर) : टेंभूर्णी, करमाळा, अमहमनगर माहामार्गावर गुरूवारी सकाळी सातच्या दरम्यान कविटगाव (करमाळा) येथील पुलावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यामधील जखमींना टेंभूर्णी येथील रूग्णालयात दाखल केले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरमधून काही मोळ्या पडल्या होत्या, यामुळे हा अपघात झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या मधील जखमींची माहिती समजू शकलेली नाही. 

कवटिगाव येथे पुलावर झालेला अपघातामुळे टेंभूर्णी आणि करमाळा या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या दुर्तफा रांगा लागल्या होत्या. करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटोळे अपघाताची माहिती समजताच वाहतुक सुरळीत करण्याबाबात सुचना केल्या. करमाळा टेभूर्णी या महामार्गाचे अपुर्ण काम यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या महामार्गावर अपाघाताची मालिका थांबता थांबत नाही. 

गुरूवारी झालेल्या अपघातामध्ये टेंभूर्णीकडून करमाळ्याकडे जाणारा ट्रक करमाळ्याकडून टेंभूर्णीकडे जाणाऱ्या ट्रकची धडक झाली. यात ट्रकचालक गंभीर जखमी असल्याचे समजते. मात्र या अपघाताची संपुर्ण माहिती समजू शकलेली नाही. वाहतुक सुरळीत करण्यासाठी करमाळा पोलिसांना परिश्रम घ्यावे लागले. क्रेनच्या सहय्याने पोलिसांनी अपघात झालेली वाहने बाजूला करून महामार्ग वाहतुकासाठी मोकळा करून दिला. सकाळी 11 वाजेपर्यंत कदंर पर्यत वाहनांची रांग होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com