ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू होती छमछम! अन्‌..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

भोगाव टोलनाका परिसरातील सुखसागर ऑर्केस्ट्रा बार या ठिकाणी काही महिला तोकडे कपडे घालून अश्‍लील हावभाव करत नृत्य करीत होत्या. याची माहिती कळल्यानंतर सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला.

सोलापूर : भोगाव टोलनाका परिसरातील सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून सोलापूर तालुका पोलिसांनी 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक हजार 570 रुपये जप्त केले आहेत. 

स्मार्ट सोलापुरात अवैध धंदे करणाऱ्यांना "मोक्का'चा झटका

भोगाव टोलनाका परिसरातील सुखसागर ऑर्केस्ट्रा बार या ठिकाणी काही महिला तोकडे कपडे घालून अश्‍लील हावभाव करत नृत्य करीत होत्या. याची माहिती कळल्यानंतर सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. 6 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेदोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

#SaveMeritSaveNation : 'रन फॉर मेरिट'मध्ये धावले शेकडो सोलापूरकर!

या कारवाईत चालक व व्यवस्थापक इम्रान हुसेन पठाण, संदीप ऊर्फ भैय्या लक्ष्मण पाटील, सुनील अशोक शिंगे, नवनाथ कुंडलिक राठोड, आशिष रमेश रजपूत, बाबू नागनाथ घोडके, शंकर अंबादास बनसोडे, आकाश गौतम सोनवणे, रियाज वाहिद तांबोळी, गौस अब्दुल रशीद शेख, शांतप्पा भीमशा माळी, शोएब ख्वाजाभाई सय्यद, गौसपाक अब्दुल मुल्ला, नदीम महेबूब तांबोळी, प्रथमेश विजय धोत्रे, निखिल सुहास पंडित, गणेश किसन कर्पेकर, राजू दत्तोबा दहिहांडे, मेघराज नागनाथ रेवडकर, इरफान अब्दुल सत्तार नदाफ, अमीर जैनुद्दीन शेख, साबीर गफार इनामदार, दत्तात्रय हिराजी अंधळे, संतोष उत्तमराव चौगुले आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक दळवी यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अनिल देवडे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on the orchestra bar