स्मार्ट सोलापुरात अवैध धंदे करणाऱ्यांना "मोक्का'चा झटका

coffee with sakal police commissioner ankush shinde
coffee with sakal police commissioner ankush shinde

सोलापूर :  मी आजवर जिथे जिथे सेवा बजाविली आहे, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधले आहेत. सोलापुरातील गुन्हेगारी नियंत्रणासोबतच अवैध धंद्यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश येत आहे. मी आल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. अवैध धंदे करणाऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात कोणत्याही भागात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असतील तर नागरिकांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी "कॉफी विथ सकाळ' उपक्रमावेळी केले. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी पोलिस आयुक्त शिंदे यांचे स्वागत केले. 

नागरिकांनी अनुभवला येथील मॉक ड्रीलचा थरार 

पोलिसिंगमध्ये जमीन-अस्मानाचा फरक 
सोलापूरला येण्यापूर्वी मी गडचिरोलीमध्ये होतो. गडचिरोली आणि इतर ठिकाणच्या पोलिसिंगमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्याठिकाणी नक्षलवाद्यांशी लढावे लागते. शस्त्रांचा वापर करून नक्षलवाद्यांना राजकीय सत्ता हातात घ्यायची आहे. याचसाठी त्यांच्या कारवाया सुरू असतात. देशातील अनेक जिल्ह्यांत नक्षलग्रस्त आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सर्वाधिक नक्षली कारवाया होत असतात. त्याठिकाणी काम करत असताना कायम दक्ष राहावे लागते. नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमकी होत असतात. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. अनेक नक्षलवादी आता शरण येत आहेत. आदिवासी भागात जनजागृतीही केली जात आहे. कालांतराने हा प्रश्‍न संपेल. 

लोकमंगलने काढले शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज 

स्मार्ट पोलिसिंगवर भर 
गुन्हेगारीची पद्धत बदलत आहे, त्याप्रमाणे पोलिसिंगही बदलत आहे. तपासामध्ये डिजिटल साधनांचा वापर वाढविला आहे. जयंती उत्सवाच्या काळातील डीजे लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. वर्गणीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. विषारी ताडी विक्रेत्यांवर आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रिंगरोड आणि उड्डाणपूल हे दोन्ही पर्याय चांगले आहेत. नवी वेस पोलिस चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. या रस्त्यावर रस्त्या लोखंडी बॅरिकेड आहेत, त्याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सिमेंटचा दुभाजक करता येऊ शकतो. 

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज 
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल सज्ज आहे. तरुणींनी आपले सोशल मीडिया अकाउंट सुरक्षितपणे वापरावे. सोशल मीडियावरून आपण कशाप्रकारच्या पोस्ट टाकतो यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. सोशल मीडियाचा योग्य वापर करायला हवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करायला हवी. चाइल्ड पोनोग्राफीवरही सायबर पोलिसांचे लक्ष आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोणतेही मेसेज पाठविले, व्हिडिओ पाहिले जर त्याचे रेकॉर्ड ठेवले जाते. तुम्ही जरी ते डिलीट केले तरी त्याचा रेकॉर्ड राहतोच. 

ऑनलाइन फसवणुकीबाबत राहावे दक्ष 
फोन करून आपल्या बॅंक खात्याची माहिती घेऊन फसवणुकीच्या घटना मध्यंतरी वाढल्या होत्या, पण गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात हे प्रमाण कमी झाले आहे. आपली माहिती विचारणारे किंवा बॅंकेतून बोलतोय असे सांगणारे लोक फसवणूक करतात हे आता नागरिकांना लक्षात येत आहे. पोलिसांसह बॅंकेच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीबाबत तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदविली तर कारवाई केली जाऊ शकते. 

 सोलापूर प्रेमळ लोकांचे शहर..
मी 1990 मध्ये महाराष्ट्र पोलिस सेवेत आलो. मी आजवर रत्नागिरी, चंद्रपूर, मुंबई, गडचिरोलीसह विविध ठिकाणी सेवा बजाविली आहे. विविध ठिकाणी सेवा बजाविली आहे. सोलापूर इतके चांगले लोक कोठेही नाहीत. येथील लोक खूपच प्रेमळ आहेत. मी मूळचा अंबाजोगाईचा असून शेतकरी कुटुंबातून पुढे आला आहे. माझे वडील, भाऊ आजही शेती करतात. 
 
- आयडॉल : रतन टाटा 
- आवड : विज्ञानाचा अभ्यासक 
- खाद्यपदार्थ : लज्जतदार मटण 
- आवडता अभिनेता : रितेश देशमुख 

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज आहेत. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करायला हवे. पोलिसांच्या मदतीने जर अवैध व्यवसाय सुरू असतील तर नागरिकांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com