अभियांत्रीकीत शिक्षण घेतलेले आदित्य शेंडे व वर्षा कोळेकर एमपीएससीमध्ये यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 20 जून 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये माढा तालुक्‍यातील निमगाव (टें) येथील आदित्य आजिनाथ शेंडे यांची तहसीलदार पदी तर बादलेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील वर्षा नाना कोळेकर हिची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. 

 

टेंभुर्णी (सोलापूर)ः माढा तालुक्‍यातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स व संगणक अभियांत्रीकीमध्ये शिक्षण घेणारे आदित्य शेंडे व वर्षा कोळेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले आहे. आदित्य शेंडे यांची तहसीलदार पदी व वर्षा कोळेकर यांची नायब तहसीलदार पदावर निवड झाली आहे. 

हेही वाचाः रुग्णसेवेसाठी सरसावले डॉक्‍टर असलेले प्रशासकीय अधिकारी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये माढा तालुक्‍यातील निमगाव (टें) येथील आदित्य आजिनाथ शेंडे यांची तहसीलदार पदी तर बादलेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील वर्षा नाना कोळेकर हिची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. 

हेही वाचाः सोशिक सोलापूरकरांवर कोट्यावधी रुपयांच्या भुर्दंडाची शक्‍यता 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये आदित्य आजिनाथ शेंडे याने हे उज्ज्वल यश मिळवले असून त्याचे शिक्षण बी. ई. इलेक्‍ट्रॉनिक्‍स झाले आहे. निमगांव (टें) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. नंतर माध्यमिक शिक्षण नेवासा येथील त्रिमुर्ती शिक्षण संस्थेत झाले आहे. ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झाले आहे. सलग चौथ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. त्याचे वडील आजिनाथ शेंडे व आई सुरेखा शेंडे हे प्राथमिक शिक्षक आहेत. 
वर्षा कोळेकर झाल्या नायब तहसीलदार 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत माढा तालुक्‍यातील बादलेवाडी येथील वर्षा नाना कोळेकर ही ची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. वर्षा कोळेकर ही शेतकरी कुटुंबातील असून प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तिने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तिचे शिक्षण बीटेक कॉम्प्युटर झाले आहे. ज्युनियर कॉलेजचे शिक्षण विवेकानंद विद्यालय कोल्हापूर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगाव टें येथे झाले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बादलेवाडी येथे झाले आहे. 
आदित्य शेंडे व वर्षा कोळेकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, धनश्री उद्योग समुहाचे अध्यक्ष रमेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक धनराज शिंदे, विठ्ठल शुगर चे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, निमगांव (टें) च्या सरपंच नागरबाई सरक, उपसरपंच रवींद्र शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Shende and Varsha Kolekar, who studied engineering, are successful in MPSC exam