पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्यांचे साहस ! अंधाऱ्या रात्रीत अंगाला शहारे आणणाऱ्या पुरात अडकलेल्या कुटुंबीयांचे वाचवले प्राण

भारत नागणे
Saturday, 19 September 2020

सांगोला आणि पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी(ता.18) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कासाळ गंगा ओढा दुथडी भरुन वाहत होता. अचनाक पावसाचा जोर वाढल्याने ओढयाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. बघता.. बघता अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अशातच पळशी येथील तानाजी लोखंडे यांच्या घराला पाण्याने वेढा दिला. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. दोघे सख्खे भाऊ, वडील, दोन महिला आणि तीन लहान मुलं अशी सगळी माणसं जीव मुठीत धरुन घराच्या पत्र्यावर जावून बसली होती. चोहो बाजूनी पाणीच पाणी होते. अंधाऱ्या रात्रीत फक्त त्यांच्यापुढे मरणचं दिसत होते. केवळ देवाचा धावा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग नव्हता, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांच्या पर्यंत जाण्याचे धाडसही कोणी दाखवत नव्हते. 

पंढरपूर(सोलापूर) ; रात्रीचे अकरा वाजलेले.. पळशी गावातून एक फोन येतो...साहेब कासाळ ओढ्याच्या पूराच्या पाण्यात लोखंडे कुटुंब अडकले आहे. काही तरी व्यवस्था करा. त्यांचा जीव वाचवा... हे शब्द ऐकताच, कोणताही विचार न करता भर पावसात अख्खी रात्र जागत पुरात अडकलेल्या कुटुंबाकडे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी धाव घेऊन त्या कुटुंबाला सुखरुप बाहेर काढले. हा थरारक प्रसंग कोणा राजकीय नेता किंवा गावच्या पुढाऱ्याच्या बाबतीत घडला नाही तर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बाबतीत शुक्रवरी (ता.18) रात्री घडला. श्री. ढोले यांनी अंधाऱ्या रात्रीतील पूराचा थरारक अनुभव अनुभवला. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सात ते आठ जणांना जीवदान मिळाले. 

हेही वाचाः शहरातील 24 नंबर प्रभागात सर्वाधिक रुग्ण ! आज 68 पॉझिटिव्ह अन दोघांचा मृत्यू 

सांगोला आणि पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी(ता.18) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कासाळ गंगा ओढा दुथडी भरुन वाहत होता. अचनाक पावसाचा जोर वाढल्याने ओढयाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. बघता.. बघता अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अशातच पळशी येथील तानाजी लोखंडे यांच्या घराला पाण्याने वेढा दिला. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. दोघे सख्खे भाऊ, वडील, दोन महिला आणि तीन लहान मुलं अशी सगळी माणसं जीव मुठीत धरुन घराच्या पत्र्यावर जावून बसली होती. चोहो बाजूनी पाणीच पाणी होते. अंधाऱ्या रात्रीत फक्त त्यांच्यापुढे मरणचं दिसत होते. केवळ देवाचा धावा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग नव्हता, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांच्या पर्यंत जाण्याचे धाडसही कोणी दाखवत नव्हते. 

हेही वाचाः अक्कलकोटच्या भाजीमंडीत मास्क न वापरण्याची बेशिस्त ः पोलिसांचे पालिकेला पत्र 

रात्री अकरा वाजता लोखंडे कुटुंब पुरात अडकल्याची माहिती येथील मारुती जाधव यांना मिळताच त्यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना रात्री 11 वाजता फोन करुन या विषयी माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री.ढोले यांनी कोणताही विचार न करता आपदग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला, परंतु जायचे कसे, पळशी गावाकडे जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. अनेक लहान ओढ्यांना पाणी आले होते. परंतु कोणताही विचार न करता, उंबरगाव- सोनके मार्गे त्यांनी पळशी गाव गाठले. गावात पोचण्यासाठी त्यांना रात्रीचे दोन वाजले. तात्काळ त्यांनी पोलिस पाटलाच्या मदतीने काही स्थानिक तरुणांना बोलावून त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अविनाश लोखंडे, दादासाहेब सकट आणि भैय्या लोखंडे यांनी पाण्यात पोहत जावून धनाजी लोखंडे, नाना लोखंडे,तानाजी लोखंडे, बाऴासाहेब लोखंडे यांच्यासह दोन महिला आणि तीन लहान मुलांना सुखरुप बाहेर काढले. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे बचाव कार्य सुरु होते. सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढल्या नंतर येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. 
प्रांताधिकारी श्री.ढोले यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवल्यामुळे लोखंडे कुुटुंबियांचे प्राण वाचले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अंगावरे शहारे आणणारा हा प्रसंग सांगताना श्री. ढोलेही भावुक झाले होते. श्री. ढोले यांनी सांगितले की, लोखंडे कुटुंबावर मोठे संकट आले होते. रात्री तीन वाजे पर्यंत बचाव कार्य सुरु होते. यामध्ये येथील स्थानिक तरुणांनी मोठी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळेच त्यांना वाचवण्यात यश आले. 

ढोले साहेब देवदुताप्रमाणे धावून आले 
संकट काळात कोणताही विचार न करता, स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आमच्यासाठी श्री. ढोले साहेब देवदूता प्रमाणे धावून आले. 
- धनाजी लोखंडे, पुरग्रस्त ग्रामस्थ 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adventure of Pandharpur Governor! The lives of the families trapped in the floods that brought Anga to the city in the dark night were saved