अक्कलकोटकरांची चिंता वाढली; गुरूवारी आढळले आठ कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

दृष्टीक्षेपात अक्कलकोट (25 जून) 

  • एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या : 49 
  • एकूण मृत रुग्ण संख्या : 04 
  • एकूण बरे होऊन आलेले रुग्ण : 12 
  • एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण : 33 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्‍यात आज पुन्हा आठ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून यामध्ये अक्कलकोट शहरातील सात व गुरववाडी येथील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. दरम्यान, तालुक्‍यातील एकूण रूग्ण संख्या 49 झाली आहे. तालुक्‍यात दररोज रूग्णसंख्या वाढत असल्याने अक्कलकोटकरांची चिंता वाढू लागली आहे. 
अक्कलकोट तालुक्‍यातील कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या एकूण 45 व्यक्तींचे स्वॅब मंगळवारी घेण्यात आले होते. अक्कलकोट तालुक्‍यातील नागरिकांना या स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा लागली होती. त्यात 31 अहवाल निगेटिव्ह तर 14 अहवाल प्रलंबित होते. त्या 14 पैकी अक्कलकोट शहरातील चार तर गुरववाडी येथील एक तसेच थेट सोलापूर येथे दाखल झालेल्या बुधवार पेठेतील दोन आणि होटकर गल्ली येथील एक रुग्ण, असे एकूण आज आठ नवीन कोरोनाबधित रुग्ण आज आढळले, आहेत अशी माहिती तहसिलदार मरोड यांनी दिली आहे. 

अक्कलकोट शहर अपडेट 
अक्कलकोट शहरात एकूण 27 रुग्ण असून त्यात मौलाली गल्ली (4), बुधवार पेठ (9), मधला मारुती परिसर (7), मुजावर गल्ली (1), बागवान गल्ली (1), म्हाडा कॉलोनी (2), होटकर गल्ली (2), संजय नगर (1) यांचा समावेश असून यात चार रुग्ण मृत असून 11 जण बरे झाले असून पाच जणांवर उपचार सुरू आहेत. 

अक्कलकोट ग्रामीण अपडेट 
अक्कलकोट ग्रामीण भागात 22 रुग्ण असून यात समर्थ नगर (6), मैंदर्गी (6), करजगी (4), पिरजादे प्लॉट (1), देशमुख बोरगाव (1), हंजगी (1), सलगर (1), गुरववाडी (2) यांचा समावेश आहे. यात एक मृत असून एक रुग्ण बरा झाला असून एकूण 19 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akkalkotkar anxiety increased 8 corona patient where found on Thursday