कोरोना : ऋतुजा राजन पाटील या कॅनडामधून म्हणाल्या... (Video)

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

मोहोळ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील या वैमानिक आहेत. त्या सध्या कॅनाडामध्ये स्थायिक आहेत. त्या म्हणाल्या, कॅनाडामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन हजारांहून अधिक झाले आहेत. त्यामुळे आता कॅनाडा सरकारने लॉकडाउन केले आहे. इथे घराबाहेर पडणे बंद केले आहे.

सोलापूर : कोरोना व्हायरसने सध्या जगभर धुमाकुळ घातला आहे. याची झळ भारताला सुद्धा सोसावी लागत आहे. भारतभर हातपाय पसरणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केला आहे. सध्या महाराष्ट्रातही संचारबंदी सुरु आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही नागरिकांनी सांगत आहेत. त्यातच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची कंन्याने देखील नागरिकांना आवाहन केले आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील या वैमानिक आहेत. त्या सध्या कॅनाडामध्ये स्थायिक आहेत. त्या म्हणाल्या, कॅनाडामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन हजारांहून अधिक झाले आहेत. त्यामुळे आता कॅनाडा सरकारने लॉकडाउन केले आहे. इथे घराबाहेर पडणे बंद केले आहे. कोरोना हा भयंकर आजार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वानी स्वागत करावे. तुमची काळजी म्हणून सरकारने निर्णय घेतले आहेत. मी पण कुटुंबासमवेत घरीच थांबली आहे. तुम्हीपण घराबाहेर जावू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal of Rutuja Rajan Patil of Mohol