करमाळा येथील अश्विनी भालेराव यांचा शिवणकामापासून स्वत:च्या दुकानापर्यंतचा प्रवास...

Ashwini Bhalerao journey from sewing to his own shop
Ashwini Bhalerao journey from sewing to his own shop

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील अश्विनी उदय भालेराव यांनी आपल्या पतीला साथ देत शिवणकामापासून व्यवसायाला सुरूवात करत आज स्वतःचे कापड दुकान सुरू केले आहे. शिवण कामातून त्यांनी स्वतः बरोबरच ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर ही भर देत साधारणपणे 20 महिलांच्या हाताला काम दिले आहे. 

अश्विनी भालेराव यांचे लग्न झाल्यानंतर घरची हलाखीची परिस्थिती सावरण्यासाठी सुरुवातीला पापड, लोनच, चटणी, कापड, पिशवी या व्यवसायापासून सुरवात केली. पती उदय भालेराव यांना मदत करण्याच्या दृष्टीने घरीच शिवणकाम सुरू केले. महिलांना लागणारी कपडे शिवून देण्याचा त्यांनी व्यवसाय सुरू केला. महिलांची कपडे शिवत असताना त्यांचा अनेक महिलांशी संपर्क आला. त्यातूनच त्यांनी ग्रामीण भागातील काही महिलांना शिवणकाम करण्याचा व्यवसाय सुरू करून दिला. शिवाय ग्रामीण भागात शिवण काम करणाऱ्या महिलांकडे अश्विनी भालेराव यांनी शिवलेली कपडे विक्रीसाठी ठेवली जाऊ लागली. त्यातून संबंधित महिलेला ही चार पैसै मिळू लागले व सौ. भालेराव यांनी शिवलेल्या कपड्याची विक्री होऊ लागली. पुढे जाऊन भालेराव यांनी आपल्या घरातच महिलांच्या कपड्याचे दुकान सुरू केले. 

ग्रामीण भागातील 12 महिलांच्या माध्यमातून शिवलेली कपडे या दुकानात विक्रीसाठी ठेवली जाऊ लागली. यातूनच ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्यांनी वेताळपेठेत साडेतीन हजार रूपये भाड्याने एक गाळा घेतला व या ठिकाणी 2016 साली महिलांच्या कपड्याचे दुकान सुरू केले. या दुकानात तीन महिला कामासाठी ठेवण्यात आल्या असून त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अश्विनी भालेराव यांनी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. करमाळा नगरपरिषदेला 5 हजार मास्क पुरवले आहेत. यासाठी त्यांनी शिवणकाम करणाऱ्या महिलांना मास्क शिवण्याचे काम दिले. यातून 27 महिलांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच नगरपरिषदेचे प्लास्टिकवर घातलेली बंदी लक्षात घेता करमाळा शहरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यावर भर दिला. 

अश्विनी उदय भालेराव यांनी सांगितले, मी लग्नाचा निर्णय स्वतःच घेतला. माझे पती उदय भालेराव यांची घरची परस्थिती साधारण असल्याने मी शिवणकामचा व्यवसाया सुरू केला. यातून माझे स्वतःचे कापड दुकान उभा राहिले आहे. शिवाय यातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात एमआयडीसीत अनेक तरुण-तरूणींच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com