सोलापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आसुड ओढा आंदोलन 

 Marath krani Morcha
Marath krani Morcha

सोलापूर : मराठा क्रांती ठोक मार्चाच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी 9 वा. आसुड ओढा आंदोलन करण्यात आले. डोळे बंद असलेल्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आसुडाने मारण्यात आले. 
मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने 21 रोजी सोलापूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यात काडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सकाळी 9 वा. मराठा क्रांती ठोक मार्चाच्यावतीने पार्क चौकातील चार पुतळ्यासमोर आसुड ओढा आंदोलन करण्यात आले. 
यावेळी मराठा क्रांती ठोक मार्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, अर्जुन सोनवणे, राहुल दहीहंडे, कुणाल मोरे, राहुल जाधव, सागर धावणे, श्रीकांत जाधव आदी मोठ्या संखने मराठा बांधव उपस्थित होते. 
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पार्क चौक येथे केंद्र आणि राज्यसरकार च पुतळा तयार करून त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले. यावेळी "एक मराठा लाख मराठा', "आरक्षण आमच्या हक्‍काचे नाही कुणाच्या बापाचे', "या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय' अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणचा निर्णय जो पर्यंत होत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. 

अत्यावश्‍याक सेवा वगळता इतर दुकाने बंद 
सोलापूर शहरातील अत्यावश्‍याक सेवा वगळता सर्व दुकाने सकाळपासून बंद होती. शहरातील नवी पेठ परिसरात सकाळी सकल मराठा समाजाच्यातीने छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे पूजन करून बंदला प्रारंभ करण्यात आला. शहरातील सर्व बाजारापेठा व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद ठेवल्या होत्या. कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय सकाळी शांततेत बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे पुरुषोत्तम बरडे, माऊली पवार, राजन जाधव, गणेश डोंगरे, आदी मान्यवर उपस्थित होते. 


सर्व जाती धार्मियांचा समावेश 

मराठा समाजाच्या या बंदला शहरातील सर्व जाती धर्माच्या समुदायाने पाठिंबा दिला होता. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया राजाभाऊ सरवदे 
यांच्यासह सर्व गटाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले असून मुस्लिम धर्मियांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवाजी चौकात सर्व धार्मिय नेत्यांनी आपला सहभाग दर्शिवला. 

संपादन : अरविंद मोटे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com