बार्शीत सोमवारी आढळले 56 कोरोनाबाधित; शहर-ग्रामीणमध्ये संसर्गाचा मोठा फैलाव, रुग्णसंख्येची 500 कडे वाटचाल 

Corona
Corona
Updated on

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर आणि तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून, सोमवारी 56 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शहरात 30 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण आढळले. यामध्ये 31 पुरुष अन्‌ 25 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 489 झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार यांनी दिली. 

बार्शी शहर आणि तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्ण बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. सोमवारी शहरातील घोडके प्लॉट एक पुरुष, एक स्त्री, वाणी प्लॉट एक स्त्री, हिरेमठ हॉस्पिटल एक स्त्री, झाडबुके मैदान एक स्त्री, नाळे प्लॉट दोन पुरुष, सुभाषनगर दोन पुरुष, एक स्त्री, पोलिसलाइन एक स्त्री, स्वराज कॉलनी तीन स्त्रिया, भवानी पेठ एक स्त्री, एक पुरुष, राऊत चाळ दोन पुरुष, तीन स्त्री, खुरपे बोळ दोन पुरुष, तुळजापूर रोड एक पुरुष, 1 स्त्री, चोरमुले प्लॉट एक स्त्री, शेळके प्लॉट एक पुरुष, देसाई प्लॉट एक पुरुष, दत्तनगर एक स्त्री, मुळे प्लॉट एक स्त्री असे 27 जण कोरोनाबाधित आढळले. 

ग्रामीण भागात दडशिंगे एक पुरुष, गुळपोळी एक पुरुष एक स्त्री, कुसळंब एक पुरुष, एक स्त्री, वैराग दोन पुरुष, एक स्त्री, मुंगशी एक पुरुष, तडवळे एक पुरुष, जामगाव सात पुरुष, सात स्त्रिया, शेळगाव एक पुरुष, चिंचोली एक पुरुष असे 26 जण कोरोनाबाधित आढळले. कोव्हिड सेंटर, हॉस्पिटल येथे 219 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 131 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्‍यात नऊजणांचा मृत्यू झाला असून कोरोना रुग्णांची संख्या 489 झाली आहे, असे डॉ. जमादार यांनी स्पष्ट केले. 

शहर व तालुक्‍यात कोरोना संसर्गाचा मोठा फैलाव झालेला दिसत असून, बरोबरीने रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. नागरिकांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी चर्चा सुरू आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com