बार्शी तालुक्‍यात दोन दिवसांत 138 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; आठ जणांचा मृत्यू 

corona.jpg
corona.jpg

बार्शी (सोलापूर) ः शहर व तालुक्‍यातील मंगळवार अन्‌ बुधवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 661 तपासणी अहवालामध्ये 138 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये शहरातील 92,तर ग्रामीण मधील 46 जण आहेत.बाधितांची संख्या 4 हजार 211 झाली आहे.बरे होऊन 3 हजार 276 जण घरी गेले आहेत.141 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.अशी माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे यांनी दिली. 

शहरातील 477 व ग्रामीण मधील 134 असे 661 अहवाल प्राप्त झाले.शहरातील 317 व ग्रामीण मधील 114 असे 431 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.शहरातील 73 तर ग्रामीणमधील 68 अशा 141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरातील 206 तर ग्रामीणमध्ये 157 अशा 363 जणांवर उपचार सुरु आहेत. 
शहरातील अलिपूररोड 9,नाईकवाडी प्लॉट 4,विठ्ठल नगर,देशमुख प्लॉट येथे प्रत्येकी 3,राऊत चाळ,बारंगुळे प्लॉट,सुभाषनगर,उपळाई रोड,मंगळवार पेठ,लोखंड गल्ली,पाटील प्लॉट,नागणे प्लॉट येथे प्रत्येकी दोन कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी आढळले. 

राऊळ गल्ली,रोडगा रस्ता,सोलापूर रोड,दत्तनगर,कथले बोळ,फुले प्लॉट,तुळशीराम रोड,मांगडे चाळ,नलावडे प्लॉट,एकविराई चौक,कासारवाडी रोड,बागवान प्लॉट,पवार प्लॉट,लातूर रोड,कसबा पेठ,कुर्डुवाडी रोड येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. 
ग्रामीण भागातील वैराग, आगळगाव, सासुरे, घोळवेवाडी, उपळाई ठोंगे, गुळपोळी, उक्कडगाव येथे प्रत्येकी दोन, चिखर्डे, पांगरी प्रत्येकी तीन, पिंपरी, खामगाव, खांडवी, जवळगाव, सौंदरे, तावडी येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळला आहे. दोन दिवसांत शहरातील 385 तर ग्रामीणमधील 138 जण निगेटिव्ह आले आहेत.13 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे खुळे यांनी सांगितले.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com