सोलापूरच्या जनतेने स्वत:हून लॉकडाउन पाळला तरच फायदा; अन्यथा..! कोण म्हणाले? वाचा 

Lockdown
Lockdown

सोलापूर : जनतेने स्वतः मी सुरक्षित, माझे कुटुंब सुरक्षित, माझी गल्ली सुरक्षित, माझा समाज सुरक्षित आणि माझा सोलापूर सुरक्षित असेल असा विचार केला तरच फायदा होणार आहे. तसेच कुटुंबप्रमुखांनी आपली मुले विनाकारण बाहेर फिरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पोलिस व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांना काटेकोरपणे करावे लागेल. यापुढे सोलापूरच्या जनतेने स्वत:हून लॉकडाउन पाळण्याची वेळ आली आहे; अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकणार नाही, असे आवाहन एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केले. 

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि स्वरांजली चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कोरोना योद्‌ध्यांच्या सन्मान कार्यक्रमात पोलिस निरीक्षक श्री. पाटील बोलत होते. या वेळी पोलिस निरीक्षक जे. एन. मोगल, मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, उद्योगपती रघुराम कंदीकटला, सुरेश हत्ती, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पल्लोलू, दयानंद मामड्याल, फाउंडेशनचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा उपस्थित होते. या वेळी पो. नि. पाटील, पो. नि. मोगल, नगरसेवक बाबा मिस्त्री, डॉ. गुर्रम, डॉ. रवींद्र गुंडेली, डॉ. श्रीकांत माकम, डॉ. अमोल अचलेरकर, डॉ. विशाल गोरे, सामाजिक कार्यकर्ते अमृतदत्त चिनी, विजय हरसुरे यांना कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. 

मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. गुर्रम म्हणाले, कोरोना काळात मार्कंडेय रुग्णालयाचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नवीन साहित्य खरेदीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. रुग्णांना योग्य उपचार करून घरी पाठविण्यात आले. कोरोनाला हरविण्यासाठी घराबाहेर पडू नये. आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्यावी. 

जेलरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोगल म्हणाले, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व पोलिस दल कसोशीने प्रयत्न करीत आहेत. अनेक पोलिस शहीद देखील झाले आहेत. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी सोलापूरच्या प्रशासनाने नियोजन केले आहे. लॉकडाउनमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. 

नगरसेवक बाबा मिस्त्री, डॉ. माकम, डॉ. गुंडेली, डॉ. अचलेरकर, डॉ. गोरे यांनीही मनोगते व्यक्त केली. रमेश परशी यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका बुधारम यांनी आभार मानले. कार्यक्रमास संजय म्हेत्रे, अनिल कंदलगी, श्रीनिवास कामूर्ती, राहुल जन्नू, अभिषेक चिंता, शिवानंद धुत्तरगी आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com