"बेस्ट फ्रॉम वेस्टः झाडांनी अन शोभीवंत वस्तूंनी सजले त्यांचे घर

प्रकाश सनपूरकर
बुधवार, 24 जून 2020

अनेक वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला आहे. घरात तुटलेले डबे, लोखंडी वस्तू, खराब झालेल्या शोभिवंत वस्तू, पाइप यासारख्या अनेक वस्तू सातत्याने भंगारमध्ये दिल्या जातात. या वस्तूंचा पुनर्वापर सुशोभीकरणासाठी करण्याचे काम त्या करत असतात. 

सोलापूरः घरातील खराब झालेल्या वस्तूंचा उपयोग सुशोभीकरण व झाडे लावण्यासाठी करण्याची बेस्ट फ्रॉम वेस्टची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे काम जानकीनगर भागातील सुनंदा नागनाथ लुत्ते यांनी करून दाखवले आहे. 

हेही वाचाः पंढरीचा विठुराया बुधवार पासून उभारणार 24 तास 

अनेक वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला आहे. घरात तुटलेले डबे, लोखंडी वस्तू, खराब झालेल्या शोभिवंत वस्तू, पाइप यासारख्या अनेक वस्तू सातत्याने भंगारमध्ये दिल्या जातात. या वस्तूंचा पुनर्वापर सुशोभीकरणासाठी करण्याचे काम त्या करत असतात. 

हेही वाचाः अमर रहे, अमर रहे... सुनील काळे.... 

शीतपेयांच्या बाटल्यांचा वापर करून त्याची उभी व आडवी रचना करत त्यामध्ये त्यांनी झाडे लावली. घरामध्ये खाद्यतेलाच्या कॅन आणल्या जातात. त्यापैकी बऱ्याचशा कॅनचा नंतर उपयोग केला जात नाही. त्यांचा उपयोग उत्तम पद्धतीने झाडे लावण्यासाठी त्या करत असतात. या कॅनची खालची बाजू कापून त्यामध्ये माती टाकून झाडे लावली आहेत. तसेच कॅनच्या समोरील बाजूला रंगकाम केल्यास ही कॅन सजावटीसाठी उपयोगी ठरते. 
घरातील पाइपचे तुकडे, एल्बो आदींचा उपयोग झाडे लावणे व सजावटीसाठी त्यांनी केला. हे तुकडे एकमेकांत अडकवून त्यामध्ये माती भरून त्यामध्ये झाडे लावली. चिनी मातीच्या फुटक्‍या बरण्यांचा उपयोग त्यांनी झाडे लावण्यासाठी केला. 
त्यांच्या घरातील प्लास्टिकच्या नारळाचे तोरण खराब झाले तेव्हा त्यांनी त्या प्लास्टिकच्या नारळाला छिद्र पाडून त्यामध्ये मनीप्लॅंटची झाडे लावली. खराब झालेल्या बास्केट व दुरड्यांचा उपयोग झाडे लावण्यासाठी केला. नळाच्या पाइपचा उपयोग झाडे लावण्यासाठी केला. या वस्तूंना झाडे लावून मार्कर पेनने रंगवता येते. या वस्तू घराच्या सजावटीमध्ये भर टाकतात. घरातील आरामखुर्ची तुटली तर त्यांनी ही खुर्ची उलटी करून त्याचा सजावटीसाठी उपयोग केला आहे. त्यांचे हे कौशल्य पाहून त्यांचे पती नागनाथ लुत्ते हे देखील त्यांना मदत करतात. पूर्वी त्या ही कलात्मक कामे घरीच करत असत. निसर्गप्रेमी ग्रुपच्या सदस्यासमवेत त्या बेस्ट फ्रॉम वेस्ट या संकल्पनेच्या चळवळीत देखील काम करत आहेत. 

छंदातून घर सजवणे झाले शक्‍य 
अनेक वर्षांपासून घरातील खराब होणाऱ्या वस्तूंचा उपयोग सजावट म्हणून करण्यास सुरवात केली. आता त्याला रंगकाम केल्याने या वस्तू अधिकच चांगल्या दिसतात. 
- सुनंदा नागनाथ लुत्ते, जानकीनगर, सोलापूर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Best from the West: Their house decorated with trees and ornaments