कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता द्या "विठ्ठल'कडे उसाच्या नोंदी : भगिरथ भालके यांचे आवाहन 

Vitthal sugar
Vitthal sugar

पंढरपूर (सोलापूर) : सध्या कारखान्याकडे 24 हजार 922 एकर उसाची नोंद झाली आहे. त्यापासून अंदाजे 13 लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होईल. सभासदांची ऊस नोंद द्यावयाची राहिली असल्यास त्या सर्व उसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्यात. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगिरथ भालके यांनी केले. 

गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 40 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ भगिरथ भालके व त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. किरण बोधले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंढरपूर मर्चंट बॅंकेचे माजी अध्यक्ष संजय भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार म्हणाले, कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके यांनी पाठपुरवा करून शासन हमीची रक्कम मंजूर करून घेतलेली आहे व त्याचा जीआर दोन दिवसांत निघेल. 

बोधले महाराज म्हणाले, श्री विठ्ठल कारखान्याला अनेक साधू-संतांचे आशीर्वाद लाभले आहेत. तालुक्‍याचे गतिमान नेतृत्व आमदार भालके हे जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना निश्‍चित प्रगतिपथावर राहील. 

कार्यक्रमावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजूबापू पाटील, बाळू लोंढे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी कारखान्याचे संचालक मोहन कोळेकर, दिनकर पाटील, विजयसिंह देशमुख, सूर्यकांत बागल, समाधान काळे, दशरथ खळगे, नारायण जाधव, संतोषकुमार गायकवाड, राजाराम भिंगारे, शांतिनाथ बागल, धनाजी घाडगे, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास भोसले, तानाजी चव्हाण, माणिक बाबर, राजाराम बाबर, दिलीप रणदिवे, पंढरीनाथ लामकाने, दिनकर चव्हाण, द्रोणाचार्य हाके, शशिकांत बागल, दीपक सदाबसे, संदीप मांडवे, सुधीर भोसले, राजेंद्र भोसले, सुधीर धुमाळ, महादेव धोत्रे, किरण घाडगे, सी. एस. पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. बोरावके उपस्थित होते. कारखान्याचे संचालक महादेव देठे यांनी आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com