भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; "सीएए', "एनआरसी'च्या विरोधात मोर्चा

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; "सीएए', "एनआरसी'च्या विरोधात मोर्चा

सोलापूर : केंद्र सरकारच्या सीएए आणि एनआरसी या बहुजनविरोधी कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज बुधवारी (ता. 29) भारत बंद पुकारण्यात आला आहे. सोलापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

सीएए आणि एनआसी कायद्याचा फटका एससी, एसटी, ओबीसीसहित मुस्लिम बांधवांना बसणार असून त्यामुळे या जुलमी कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या देशभरात बंद पुकारून रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रॅलीला सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीचा समोराप झाला. या रॅलीमध्ये गौतम गायकवाड, मल्हार कसबे, संतोष गजधाने, सिद्धार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, तानाजी बोकेफोडे आदी उपस्थित होते. 

बहुजन क्रांती मोर्चाने बंद पुकारल्याने आज शहर अनेक ठिकाण दुकाने बंद असल्याचे दिसून आले. विजापूर वेस, विजापूर नाका, नई जिंदगी, कुमठा नाका या परिसरात बहुतांश दुकाने बंद होती. दुपारपर्यंत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com