
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ता. 13 व 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर शहराला भेट दिली होती. तेव्हा हरीभाई देवकरण प्रशालेतील मुळे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या त्यावेळी जिल्हा लोकल बोर्ड व म्युनसिपल कॉन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा भव्य सत्कार झाला. यावेळी त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. तत्कालिन नगराध्यक्ष कै.रावबहादूर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांनी हे मानपत्र त्यांना प्रदान केले होते. ही घटना एैतिहासीक ठरली होती. त्यावेळी फॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे डॉ. आंबेडकरांनी मुक्काम केला होता. तेव्हा तेथील पचलेलू कुटुंबाने आजही डॉ. आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तुंचे जतन केले आहे. या मुळे या घटनेच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत.
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरला दिलेल्या भेटीच्या घटनेला 75 वर्षे आज पूर्ण होत आहेत. त्यांच्या या भेटीच्या स्मृती आजही शहरवासियांनी जतन केल्या आहेत.
हेही वाचाः लर्न कोच, रिन्युएबल एनर्जी आणि स्मार्ट चार्जरची निर्मिती ः संगणक अभियंता अविनाश गवळी यांची कामगिरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ता. 13 व 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर शहराला भेट दिली होती. तेव्हा हरीभाई देवकरण प्रशालेतील मुळे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या त्यावेळी जिल्हा लोकल बोर्ड व म्युन्सिपल कॉन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा भव्य सत्कार झाला. यावेळी त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. तत्कालिन नगराध्यक्ष कै.रावबहादूर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांनी हे मानपत्र त्यांना प्रदान केले होते. ही घटना एैतिहासीक ठरली होती. त्यावेळी फॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे डॉ. आंबेडकरांनी मुक्काम केला होता. तेव्हा तेथील कुटुंबाने आजही डॉ. आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तुंचे जतन केले आहे. या मुळे या घटनेच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत.
डॉ. आंबेडकर यांनी 1946 पुर्वी देखील त्यांनी सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी घेतल्या होत्या. तसेच काही कार्यक्रम देखील त्यांच्या उपस्थितीत झाले. सोलापूर म्युनसिपल कौन्सीलने डॉ.आंबेडकरांना दिलेले मानपत्र ही एक सोलापूरच्या सार्वजनिक जीवनातील एैतिहासीक ठेवा बनली. आज या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत.
या घटनेचे स्मरण म्हणून महानगरपालिकेने या घटनेची स्मृती जपण्यासाठी कोनशिला उभारण्याचा ठराव घेतला आहे. तसेच प्रयास संस्थेचे सचिन शिंदे यांनी अब्दुलपूरकर कुटुंबीयांचा विशेष मानपत्र देऊन सत्कार केला. या परिवाराला डॉ.आंबेडकरांचा सन्मान करण्याची एैतिहासीक संधी मिळाली. म्हणून हा गौरव करण्यात आला. यावेळी सचिन शिंदे यांच्यासह शरणबसवप्पा अब्दुलपूरकर, अमित अब्दुलपूरकर, रोहित अब्दुलपूरकर, रघुराज चिंचोळी, रोनक अब्दुलपूरकर,
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डाॅ..बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार, डॉ.आंबेडकर उद्यान, व प्रबूध्द भारत मार्ग कार्यक्रम होत आहेत.