लर्न कोच, रिन्युएबल एनर्जी आणि स्मार्ट चार्जरची निर्मिती : संगणक अभियंता अविनाश गवळी यांची कामगिरी 

avinash gavli new.jpg
avinash gavli new.jpg

सोलापूर ः पुण्यात स्वतःची कंपनी असताना लॉकडाऊनमध्ये सोलापुरात परतलेले संगणक अभियंता अविनाश गवळी यांनी स्वतःच्या करिअरला नवे वळण देत सोलापुरात स्वतःच्या कंपनीचे काम सुरू केले. एवढेच नव्हे, तर लॉकडाउनच्या वेळाचे पुरेपूर उपयोग करत लर्न कोच नावाचे शैक्षणिक व्यवस्थापन व मूल्यमापन करणाऱ्या प्रोडक्‍टची निर्मिती केली. पुण्यात जे केले जाऊ शकते, ते सोलापुरातूनदेखील करता येते, अशी प्रेरणा देणारी अविनाश गवळी यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. 

अविनाश गवळी हे मूळचे जुळे सोलापुरातील रहिवासी आहेत. संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वर्ष 2009 मध्ये पुण्यात स्वतःची अर्थ सोल्यूशन्स कंपनी स्थापन केली. त्यांची अर्थ सोल्युशन कंपनी अनेक संस्थासोबत टेक्‍नॉलॉजी पार्टनर म्हणून काम करते. रिन्युबल एनर्जी या अंतर्गत त्यांनी सौर व पवन उर्जेवर आधारित केलेल्या टर्बाईनची निर्मिती केली. ही निर्मिती सध्या पेटंट नोंदणी प्रक्रियेत आहे. जास्त पाऊस पडणाऱ्या आसाममध्ये त्याचा उपयोग सध्या केला जात आहे. त्यासोबत त्यांनी ई-रिक्षा चार्ज करण्यासाठी त्यांनी स्मार्ट चार्जर तयार केले. 
कोरोनाच्या संकटात ते सोलापुरात त्यांच्या घरी परतले. तेव्हा त्यांनी सोलापुरात एक टीम लॉकडाउनच्या काळात तयार केली. या टीमच्या मदतीने त्यांनी सोलापुरात त्यांच्या कंपनीची ब्रॅंच सुरु केली. नंतर सोलापुरातच राहून त्यांनी पुन्हा संशोधनाला सुरुवात केली. लर्न कोच (learn Quoch) या विशेष शैक्षणिक प्रोडक्‍टची त्यांनी निर्मिती केली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या अध्ययन घटकाबद्दल संकल्पना स्पष्टीकरण, अभ्यासातील अडचणी, सराव व त्यातून मिळवलेले प्राविण्य या सर्व प्रक्रिया समग्र अभ्यासाद्वारे साधता येतील, अशा प्रकारची निर्मिती केली. तसेच या कामात पालक व शिक्षकांचा रोल निश्‍चित करून त्यांनाही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल सातत्याने लक्ष ठेवता येणार आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांचे हे प्रोडक्‍ट अत्यंत उपयोगी ठरले आहे. आजकाल असलेली ऑनलाइन शिक्षणाची एकतर्फी माध्यमांच्या सर्व दोषांवर मात करत त्यांनी अधिक प्रभावी असे प्रोडक्‍ट निर्माण केले. आता या प्रोडक्‍टची मागणी स्थानिक शाळांनी करण्यास सुरवात केली आहे. दमाणी विद्या मंदिरने या प्रोडक्‍टला स्वीकारून सुरवात केली आहे. त्यामुळे जे पुण्यात होते, ते सोलापुरातदेखील करता येते, हा धडा अविनाश गवळी यांच्या प्रयोगाने घालून दिला आहे. 

ठळक बाबी 
- पुण्यातील कंपनीचे काम सोलापुरात सुरु 
- लर्न कोच या शैक्षणिक प्रोडक्‍टची लॉकडाउनमध्ये निर्मिती 
- रिन्युएबल एनर्जी टर्बाईन निर्मितीची पेटंटसाठी नोंदणी 
- ई-रिक्षासाठी स्मार्ट चार्जरची निर्मिती 

पुण्यात नव्हे तर सोलापुरात संधी 
सोलापुरात उत्कृष्ट दर्जाची अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात जाऊन करिअर करण्याबद्दल माझे मत बदलले आहे. पुढील काळात मी सोलापुरात राहणार असून किमान दहा वर्षे सोलापूरच्या आयटी क्षेत्राला चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. 
-अविनाश गवळी, संचालक, अर्थ सोल्यूशन्स प्रा. लि., सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com