सोलापूरकरांसाठी खुषखबर ! आता झोन कार्यालयातच मिळणार जन्म-मृत्यू दाखले 

तात्या लांडगे 
Tuesday, 15 September 2020

महापालिकेच्या मध्यवर्ती इमारतीत जन्म व मृत्यूची नोंदणी, दुरुस्ती व दाखले वाटप केले जात होते. कोरोनामुळे महापालिकेत दररोज मोठी गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टन्सिंचे पालनही केले जात नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना सहजपणे नोंद करता यावी या हेतूने जन्म व मृत्यूचे दाखले विभागीय कार्यालयातून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. 

सोलापूर : शहरातील नागरिकांना आता शहरातील आठ विभागीय कार्यालयांमध्येच जन्म व मृत्यूचे दाखले दिले जातील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी दिली. 

हेही वाचा : "माणिकचमन' या द्राक्ष वाणाचे निर्माते त्र्यंबक तात्या दबडे 

महापालिकेच्या मध्यवर्ती इमारतीत जन्म व मृत्यूची नोंदणी, दुरुस्ती व दाखले वाटप केले जात होते. कोरोनामुळे महापालिकेत दररोज मोठी गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टन्सिंचे पालनही केले जात नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना सहजपणे नोंद करता यावी या हेतूने जन्म व मृत्यूचे दाखले विभागीय कार्यालयातून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. 1991 ते 2020 या कालावधीतील दाखले त्या ठिकाणी मिळणार आहेत. जे दाखले संगणकात नोंदणी केलेले नाहीत, त्यांना मात्र महापालिकेतील मध्यवर्ती इमारतीत यावे लागणार आहे. नवीन नोंदणी, दुरुस्तीची कामे अभिलेखापाल कार्यालयात केली जाणार आहेत. नागरिकांनी आता महापालिकेत गर्दी करू नये, असे आवाहनही श्री. पांडे यांनी केले आहे. या निर्णयामुळे महापालिकेत दररोज येणारे 150 ते 200 पालकांची गर्दी कमी होणार आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी : राज्यातील साडेसात लाख रुग्णांची कोरोनावर मात; सोलापुरातील मृत्यूदर झाला कमी 

कोरोनामुळे गर्दी करू नका 
सोलापुरातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढू होत आहे. ग्रामीण भागातील अनेकजण शहरात विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी ये-जा करत असतात. तर शहरातील कोरोनाही अद्याप हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही ठिकाणी आणि अनावश्‍यक गर्दी करू नये, महापालिकेतील मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीत जन्म-मृत्यूचे दाखले घेण्यासाठी मोठी गर्दी नागरिक करू लागले आहेत. मात्र, आता त्यांच्याच भागातील विभागीय कार्यालयांमध्ये दाखले देण्याची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विभागीय कार्यालयात त्यांच्या वेळेत येऊन दाखले घेऊन जावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birth and death certificates will now be available at the zonal offices