राष्ट्रवादी अन्‌ भाजपने कोरोनात शोधले राजकारण...?

BJP and NCP Politics  from Corona in Solapur
BJP and NCP Politics from Corona in Solapur

सोलापूर : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन सुरु आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी नागरिकांशी संवाद साधून सूचना करत आहेत. त्याचे पालन नागरिक करताना दिसत आहेत. जिल्हा बंदीचा आदेश असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून कोणी आला तर त्यावर लक्ष ठेवले जात आहे. यातून लोकप्रतिनीधी सुद्धा सुटत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : मला होमक्वारंटाईन करण्यामागे राजकीय षडयंत्र
मोहोळ आणि माळशिरस येथील आमदारांबाबत असा प्राकर घडला आहे. मोहोळच्या आमदारांना होमक्वारंटाईन करा, अशी मागणी येथील भाजपने मागणी केली आहे. तर दुसरीकडे माळशीरसच्या आमदारांना होमक्वारंटाईन करा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली.
देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आधीच नागरिकांपुढे अनेक प्रश्‍न आहेत. त्यात लोकप्रतिनिधी काहीच काम करत नाहीत, अशी समाज माध्यमातून टिका केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र काम करत असताना त्यांनाच आडकाठी घालण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. लॉकडाऊनचा सर्व घटकांवर परिणाम झालेला आहे. अनेकांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उद्योग, व्यवसाय बंद असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरजू नागरिक सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याला सामाजिक संघटना उद्योजक, लोकप्रतिनिधी सुद्धा पुढे येत आहेत. मात्र त्याला आता राजकारणाचा वास येऊ लागला आहे. या काळात राजकारण करु नये, अशी सर्व सामान्यांची अपेक्षा आहे. कायदेशीर प्रक्रियेने आणि सामाजिक भान ठेऊन जे ज्याला चांगलं करता येईल ते करणे आवश्‍यक आहे. परंतु ज्याच्या चुका आहेत. त्याच्या चुका सुद्धा दाखवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने व भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे हे दोन्ही आमदार असल्याने खरच कोरोनाला रोखण्यासाठी ही मागणी केली आहे का? की यातही राजकारण आहे. असा प्रश्‍न यातून केला जाऊ लागला आहे.

हेही वाचा : महत्त्वाची माहिती : सोलापूरचे नाव सोलापूरच का? जाणून घ्या कारण
काय आहे प्रकरण...

माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते हे बीड व पुणे येथून आले आणि त्यांनी माळशीरस पंचायत समितीमध्ये कोरोनाच्या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी आमदार सातपुते यांना इतर जिल्ह्यातून आल्यामुळे होम क्वरंटाईन करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी शमा पवार यांनी आमदार सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचा आदेश दिला. त्यानंतर काही दिवसातच मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी भाजपने केली आहे. आमदार माने यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून येऊन मोहोळ तालुक्यातील पाटकुल, सावळेश्‍वर या गावांना भेटी दिल्या. त्यामुळे भाजपचे मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्‌वारे आमदार माने यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज! चौथ्या लॉकडाऊनची ठरली 'ही' तारीख; आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार नव्हे तर रुग्णसंख्येवरून ठरणार नियोजन?
माझं घरात बसून काम सुरुच

माळशिरसचे आमदार राम सातपुते म्हणाले, कोराना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मी माझे काम करत आहे. यात राजकारण करण्याची गरज नाही. सोलापूरचे पालकमंत्री व विभागीय आयुक्त हे सुद्धा पुणे जिल्ह्यातून येतात. मग त्यांनाही होम क्वारंटाईन करायचे का? पालकमंत्री संध्या चांगले काम करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही जीवाचे रान करत आहे. मात्र, काही तरी सुडबुद्धीने यात राजकारण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने मी नागरिकांची कामे करत आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवून घेत आहे. याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आढावाही घेत आहे. अशा स्थितीत राजकारण करणे चुकीचे आहे. मी आदेश मानणारा असून आदेशाचे पालन करत माझे काम सुरुच आहे.  

मग लोकप्रतिनीधीचे काम काय?
राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने म्हणाले, संकटकाळात लोकप्रतिनिधींनी नागरिकांनी धीर देणे गरजेचे आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी फिरावे लागते. त्यांच्यात जावे लागते. मग त्यांच्या समस्या जाणून घेणे व प्रशासनाला सूचना करणे हे चुकीचे आहे का? यात कोणीही राजकारण करु नये. मीही माझ्या मातदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. त्यांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असला तरी प्रथम लोकांच्या समस्या सोडवणे हे त्याचे काम आहे. आणि ते करणे चुकीचे नाही. 

राजकारण करणे चुकीचे
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधण्यात आला. त्यावर ते म्हणाले. जे काम करत आहेत. त्यांना काम करु देणे आवश्‍यक आहे. यामध्ये कोणीही राजकारण करु नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com