भाजप नगरसेवक कामाठीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी! आंध्रातील विजयवाड्यातून गुन्हे शाखेने केले अटक 

199241_109861255836752_115627169_n - Copy.jpg
199241_109861255836752_115627169_n - Copy.jpg

सोलापूर : अशोक चौकातील एका इमारतीच्या आडोशाला अवैधरित्या मटका बुकीचा व्यवसाय चालविणारा भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची माहिती घेऊन जप्तीच्या अनुषंगाने कारवाई सुरु केली होती. गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक आंध्र प्रदेशात पोहचले. त्याची कूणकूण लागताच विजयवाडा येथून हैदराबादकडे पळून जाताना पोलिसांनी कामाठीला पहाटे साडेतीन वाजता अटक केली.

ठळक बाबी... 

  • कामाठीच्या मालमत्ता जप्त करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सुरु केली होती कारवाई 
  • अवैध मटका बुकीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून कामाठी होता फरार 
  • आतापर्यंत 288 जणांवर गुन्हे दाखल; 60 हून अधिकजणांना झाली अटक 
  • आंध्र प्रदेशातील मच्छल्लीपट्टणम- वियजवाडा येथून पळून जाताना पोलिसांनी पकडले 
  • आंध्रात असल्याची माहिती पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली; गुन्हे शाखेचे पथक होते मागावर 
  • पोलिस आपल्या शोधासाठी आंध्रात आल्याची माहिती मिळताच कामाठी हैदराबादकडे जात होता पळून 
  • अवैध मटका प्रकरणात न्यायालयाकडून कामाठीला मिळाली 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी 

न्यू पाच्छा पेठे कोंची कोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीत 24 ऑगस्टला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी काहीजण पळून गेले, तर एकाचा इमारतीवरुन पडल्याने मृत्यू झाला. या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, पोलिसांनी त्याच्याबद्दलची माहिती त्याची पत्नी व आकाश कामाठी याच्या आईकडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर न राहताच त्या दोघींनीही पलायन केले. त्यानंतर कामाठी पोलिसांत हजर राहत नसल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान, गुप्तहेरांकडून कामाठी आंध्र प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 26 स्पटेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com