भाजप खासदार उच्च न्यायालयात...का वाचा 

तात्या लांडगे
Thursday, 27 February 2020

  • ऍड. संतोष न्हावकर मुंबईत : तक्रारदारांनीही गाठली मुंबई 
  • तहसिल कार्यालयाकडे खासदारांचा जातीचा मूळ दाखलाच नाही 
  • 2003 मधील रजिस्टरमध्ये वेगळ्या अक्षात दाखल्याची नोंद 
  • जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकासह तहसिलदारांचे स्पष्टीकरण

सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र येथील जात पडताळणी समितीने रद्द ठरविल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या (गुरुवारी) डॉ. महास्वामी याचिका दाखल करणार असून त्यांचे वकील संतोष न्हावकर मुंबईत दाखल झाले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : 20 मार्चपासून बीएस- फोर वाहनांची नोंदणी बंद 

कॉंग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करीत खासदारकी मिळवणारे डॉ. महास्वामी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी जोडलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य दोघांनी उच्च न्यायालयात केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार तक्रारदारांनी जात पडताळणी समितीकडे धाव घेतली. आता जात पडताळणी समितीने डॉ. महास्वामींचा जातीचा दाखला रद्द केला आहे. दरम्यान, त्यांच्याकडे जातीचे मूळ प्रमाणपत्रच नसल्याचा दावाही समितीने केला आहे. तत्पूर्वी, डॉ. महास्वामी यांनी वळसंग (ता. अक्‍कलकोट) पोलिस ठाण्यात दाखला गहाळ झाल्याची फिर्याद नोंदवली आहे. दुसरीकडे तक्रारदारांनीही मुंबई गाठली असून ते जात पडताळणी समितीचा निकाल न्यायालयासमोर सादर करणार आहेत. 

हेही नक्‍की वाचा : खुषखबर ! गाड्यांच्या वेग वाढीला रेल्वे बोर्डाची मान्यता 

आज याचिका दाखल करणार 
जात पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द केला. त्या निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली असून उद्या (गुरुवारी) न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. 
- ऍड. संतोष न्हावकर, खासदार डॉ. महास्वामींचे वकील 

हेही नक्‍की वाचा : खुषखबर ! पाठदुखीचा त्रास होणार कमी 

तहसील कार्यालयाकडे नाही दाखला 
भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी अक्‍कलकोट तहसील कार्यालयातून जातीचा दाखला घेतला आहे. 2003 मधील रजिस्टरमध्ये त्याची नोंद आहे, परंतु ती नोंद वेगळ्याच अक्षरात आहे. 2003 व 2005 मध्ये त्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी दाखला नेल्याचीही नोंद तहसीलकडे आहे. मात्र, डॉ. महास्वामी यांचा जातीचा मूळ दाखला तहसील कार्यालयाकडे नाहीच, असे तहसीलदार अंजली मरोड यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Jayadheshwara Mahaswami High Court