esakal | वाहनचालकांसाठी ! बीएस-फोर वाहनांची नोंदणी बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

BS-04

हवा प्रदूषण वाढल्याने केंद्राचा निर्णय 
वाहनांच्या संख्येत दरवर्षी भरघोस वाढत होत असल्याने हवा प्रदूषण झपाट्याने वाढू लागले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार काही महिन्यांपूर्वी बीएस- 3 वाहनांची विक्री बंद केली. आता बीएस-फोर वाहने विक्रीवर बंधने घातली आहेत. 1 एप्रिलपासून बीएस-6 वाहने उत्पादन करणे उत्पादन कंपन्यांना बंधनकारक केले आहे. तत्पूर्वी, वाहन खरेदी करताना ग्राहकांनी 25 मार्चपूर्वी (गुढीपाडवा) वाहनांची सर्व पूर्तता करुन घ्यावी. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

वाहनचालकांसाठी ! बीएस-फोर वाहनांची नोंदणी बंद 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : देशात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने प्रदूषित शहरांची संख्येत भर पडली आहे. हवेतील कार्बन मोनाक्‍साईड, नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण वाढल्याने श्‍वसनाचे विकारात भर पडत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता बीएस-4 वाहनांची नोंदणी 20 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. आता बीएस-6 वाहनांचे उत्पादन घेणे कंपन्यांना बंधनकारक केले असून कंपन्यांनी डिसेंबरपासून बीएस-4 गाड्यांचे उत्पादन थांबवले आहे. 

हेही नक्‍की वाचा : बळीराजासाठी गूड न्यूज ! 28 फेब्रुवारीला कर्जमाफीची दुसरी यादी 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशातील बीएस-फोर ही वाहने 31 मार्चपासून बंद केली जाणार आहेत. अशा वाहनांच्या नोंदणीसाठी नोंदणी शुल्क तथा कर भरला असला, तरीही मार्चनंतर अशा वाहनांची नोंदणी करु नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार काही कारणास्तव बीएस-फोर वाहनांची नोंदणी प्रलंबित असल्यास अशा ग्राहकांची माहिती घेवून त्यांची नोंदणी मार्चपूर्वी मार्गी लावावी, असे परिवहन आयुक्‍तालयाने स्पष्ट केले आहे. गुढीपाडव्यानिमित्त वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनीही 25 मार्चपूर्वी किमान सहा ते सात दिवसांपूर्वी वाहनांची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून करण्यात आले आहे. 


हेही नक्‍की वाचा : अरेच्चा ! खासदार डॉ. महास्वामींकडे मूळ जात प्रमाणपत्रच नाही 


परिवहन आयुक्‍तालयाच्या सूचना... 

  • 20 मार्चपूर्वी संगणकीय प्रणालीत होणार बदल 
  • बीएस-फोर वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया 20 मार्चपूर्वी करावी पूर्ण 
  • गुढीपाड्याच्या सात दिवस अगोदर बीएस-फोर वाहनांची करुन घ्यावी नोंदणी 
  • बीएस-फोर वाहनांची विक्री करणाऱ्या वितरकांवर होणार कायदेशिर कारवाई 
  • 1 एप्रिलपासून बीएस-सहा वाहनांची विक्री बंधनकारक : बीएस-फोर वाहनांवर बंदी 

हेही नक्‍की वाचा : खुषखबर ! पाठदुखीचा त्रास होणार कमी