प्रचाराच्या निमित्ताने ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे उपस्थित होते. चरेगावकर म्हणाले, विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून मी देखील ईच्छुक होतो. परंतु मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज होणाऱ्यां पैकी कार्यकर्ता नाही. भाजपच्या पदवीधर व शिक्षकच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी पाचही जिल्ह्यात फिरत आहे. भाजप हा पार्टी विथ डिफरन्स पक्ष असल्याचे या निवडणुकीतून सर्वांना दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सोलापूर: बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह देशातील विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भाजपचा कार्यकर्ता हा व्यक्तीपेक्षा पक्षाला अधिक प्राधान्य देतो. विधान परिषदेचा पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे यंदाच्या पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचाः भारतनानारुपी आधारवड गेल्याने मंगळवेढा पोरका झाल्याची भावना
प्रचाराच्या निमित्ताने ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे उपस्थित होते. चरेगावकर म्हणाले, विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून मी देखील ईच्छुक होतो. परंतु मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज होणाऱ्यां पैकी कार्यकर्ता नाही. भाजपच्या पदवीधर व शिक्षकच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी पाचही जिल्ह्यात फिरत आहे. भाजप हा पार्टी विथ डिफरन्स पक्ष असल्याचे या निवडणुकीतून सर्वांना दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा ः दौरा रोहित पवारांचा, आठवण शरद पवारांची
सहकाराच्या समस्यांसाठी अभ्यास गट
साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय, सुतगिरणी यासह महाराष्ट्रात असलेल्या विविध सहकारी संस्थांमध्ये काय अडचणी आहेत? त्या अडचणी सोडवण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात? यासाठी भाजपच्या सहकार आघाडीच्यावतीने सर्वपक्षीय अभ्यासगटाची नियुक्ती केली जाणार आहे. भाजपच्या सहकार आघाडीचे सहसंयोजक पद आपल्याकडे असून सहकार आघाडीच्या माध्यमातून हा अभ्यास गट नियुक्त केला जाणार आहे. त्यानंतर सहकाराला ऊर्जितावस्था आणण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार असल्याचेही शेखर चरेगावकर यांनी सांगितले.