वडिलांचा खून करून मुलगा साथीदारासह देवदर्शनाला 

The boy murdered his father and accompanied his companions to Devdarshan
The boy murdered his father and accompanied his companions to Devdarshan
Updated on

कुर्डू (सोलापूर) : वडिलांच्या खुनाची घटना मार्गी लावून संशयित आरोपी मुलाने आपल्या साथीदारांना घेऊन एका तीर्थक्षेत्राची वारी केल्याची माहिती अंगद घुगे खून प्रकरणात उजेडात आली आहे. या वारीतील एक साथीदार फरार असून इतरांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. 

लऊळचे कृषी सहायक अंगद घुगे 
लऊळचे कृषी सहायक अंगद घुगे खूनप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी घुगे यांचा मुलगा विशाल याची दिवसभर कसून चौकशी केली. दोन दिवसांत खुनाच्या घटनेचा पूर्णतः उलगडा होण्याची शक्‍यता आहे. लऊळ शिवारात 17 जानेवारी रोजी सकाळी अंगद घुगे यांचा खून केलेला मृतदेह आढळून आला. फोन कॉलवरून घटनेतील वाहन जप्त केले. त्यानंतर संशयित म्हणून घुगे परिवारातील सदस्य पोलिसांच्या रडावर आले. घुगेंचा मुलगा विशालला उस्मानाबादच्या रुग्णालयातून अटक झाली. हा घटनाक्रम चार दिवसांत घडला. 

विशालची वैद्यकीय तपासणी 
मंगळवारी पोलिसांनी विशालला ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर प्रमुख संशयित आरोपी घुगे परिवारातीलच आणखी एक सदस्य पोलिसांच्या हाती लागेल, अशी माहिती पुढे येत आहे. खुनाची घटना घडल्यानंतर काही संशयित आरोपी तीर्थक्षेत्राला गेल्याचा तपास पोलिस पथकाने काढला. त्यामधील एकजण फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे दोन दिवसांत आरोपींची संख्या व खून प्रकरणातील कटकारस्थान उघड होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Maharashtra government issued the order immediately after Shinde reviewed the arrangements during his visit to Pandharpur.
The three-kilometre stretch remains unpaved even after decades, affecting daily transportation and village connectivity.
The memorandum highlights severe rainfall deficit, fodder shortage, water scarcity, irregular power supply and the need for employment generation in Solapur district.
The Sant Surdas Divyang Wari, organised by Seva Samarpan Pratishthan, combines spiritual devotion with empowerment for visually impaired students.
Marathi News Esakal
www.esakal.com