कोरोनामुळे 'या' समाजाचा व्यवसाय आडचणीत 

प्रशांत देशपांडे 
बुधवार, 27 मे 2020

हा पण व्यवसाय बंद पडल्याने जगण कठीण झाले 
उदरनिर्वाहासाठी अगोदर आम्ही खेडोपाडी जाऊन विविध नाटकं सादर करीत होतो. मात्र, कालांतराने हा व्यवसाय बंद पडला. सध्या आम्ही पुस्तके, फोटो विक्रीचा व्यवसाय करतो, मात्र लॉकडाउनमुळे आमचा हा व्यवसाय देखील बंद पडला आहे. त्यामुळे आमचं जगणं कठीण झाले आहे. 

सोलापूर : देवदेवता, महापुरुषांचे फोटो, केरसुणी, भांडी-कुंडी घरोघरी जाऊन विक्री करणारा, पोलिसांच्या वेशभूषेत दुकानासमोर मनोरंजन करून पैसे कमविणाऱ्या बहुरूपी समाजावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. लॉकडाउनमुळे या समाजातील महिलांच्याही भांडी विक्रीचा व्यवसाय अडचणीत आला आसल्याने सोलापुरातील समाजातील नागरिकांनी मांडल्या व्यथा. 

हेही वाचा : खासदार रणजितसिंह निबांळकर यांनी राज्यपालांना काय सांगितले 

सोलापुरात सोरेगाव, माशाळवस्ती येथील बहुरूपीनगर आणि विजयपूर रोडवरील आरटीओ कार्यालयाशेजारी या समाजाचे वास्तव्य आहे. बहुरूपी समाजातील कलावंत खेडोपाडी जाऊन रामायण, महाभारताची नाटके सादर करीत होता. धार्मिक कार्यक्रम, जत्रांमध्ये जाऊन कार्यक्रम करत असे. कालांतराने टीव्हीने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले. तरीही हार न मानता हा समाज देवी-देवतांचे फोटो, पुस्तके, भांडी, झाडू यांसह विविध साहित्य घरोघरी जाऊन विक्रीचा व्यवसाय करू लागला. महिला प्रत्येक घरात जाऊन भांडी विक्री करीत व भिक्षा मागत. मात्र, सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असल्याने समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सध्या बंद असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना एकदाच धान्याचे कीट दिले, मात्र आज ते धान्य देखील संपल्याने समाजावर उपासमारीची वेळ आली असल्याचे चित्र आहे. 
 
हा पण व्यवसाय बंद पडल्याने जगण कठीण झाले 
उदरनिर्वाहासाठी अगोदर आम्ही खेडोपाडी जाऊन विविध नाटकं सादर करीत होतो. मात्र, कालांतराने हा व्यवसाय बंद पडला. सध्या आम्ही पुस्तके, फोटो विक्रीचा व्यवसाय करतो, मात्र लॉकडाउनमुळे आमचा हा व्यवसाय देखील बंद पडला आहे. त्यामुळे आमचं जगणं कठीण झाले आहे. 
- महादेव सितारे, बहुरूपीनगर, विजापूर रोड 

हेही वाचा : महावितरणचा नवा उपक्रम एक गाव, एक दिवस 

आम्ही भांडी विकून उदरनिर्वाह करत होतो 
सरकारने आमच्या व्यथा जाणून घ्याव्यात. आम्ही भांडी विकून उदरनिर्वाह करत होतो. मात्र, सध्या सगळं बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घर कसं चालवायचं, हा प्रश्‍न आमच्यासमोर उभा राहिला आहे. 
- यल्लप्पा तेली, बहुरूपीनगर, विजयपूर रोड 

आता जगायच कस हा प्रश्‍न समोर उभा राहिला 
एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने धान्याचे किट देण्यात आले होते. मात्र, तेही आता संपल्याने आता खायचं काय, हा प्रश्‍न समोर उभा राहिला आहे. तरी आम्हाला मदत करावी. 
- मल्लेश सूर्यवंशी, बहुरूपी समाज अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business of this community in trouble because of the corona