टेंभुर्णीत मुख्य ओढ्याची सफाई मोहिम सूरू 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 27 जून 2020

यावेळी उपसरपंच धनंजय गोंदिल, ग्रामपंचायत सदस्य वैभव कुटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, गणेश केचे, राजेंद्र कोठारी, तानाजी येवले-पाटील, डॉ.सोमनाथ साळुंके, हरिभाऊ सटाले, शेखर जाधव, शैलेश ओहोळ, संदीप लोंढे, नामदेव धोत्रे, यशपाल लोंढे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. 

टेंभुर्णी(सोलापूर)ः टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील मध्य भागातील मुख्य ओढ्यामध्ये वाढलेली झाडे-झुडपे व गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सातपुते यांच्या हस्ते व सरपंच प्रमोद कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 

हेही वाचाः गृहमंत्र्याकडून पोलिस सदनिका व निवास निवास प्रकल्प मंजुरीची अपेक्षा 

यावेळी उपसरपंच धनंजय गोंदिल, ग्रामपंचायत सदस्य वैभव कुटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, गणेश केचे, राजेंद्र कोठारी, तानाजी येवले-पाटील, डॉ.सोमनाथ साळुंके, हरिभाऊ सटाले, शेखर जाधव, शैलेश ओहोळ, संदीप लोंढे, नामदेव धोत्रे, यशपाल लोंढे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. 

हेही वाचाः बार्शीत युवक कॉंग्रेसने केला कोरोना योध्दयांचा सन्मान 

टेंभुर्णी शहराच्या मध्यवर्ती भागात ओढा असून या ओढ्यामध्ये काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच गाळ ही मोठ्या प्रमाणावर साठला असल्याने दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. त्यामुळे ओढ्यातील गाळ व झाडेझुडपे काढून ओढा स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून टेंभुर्णी ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. 
या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण ओढा पावसाळ्याच्या सुरुवातीस स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाजारतळापासून ते पुणे- सोलापूर जुना हायवे पर्यंत ओढ्यातील गाळ व झाडेझुडपे पोकलेन मशीनच्या साहाय्याने काढून ओढ्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार असल्याचे टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे यांनी सांगितले. 

गावच्या आरोग्यासाठी लाभदायक 
टेंभुर्णीतील नागरिकांनी ओढा स्वच्छ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली होती. त्यामुळे खास बाब म्हणून 14 व्या वित्त आयोगाच्या व्याज रक्कमेतून ओढ्यातील गाळ व झाडेझुडपे काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ओढा स्वच्छ होऊन नागरिकांच्या आरोग्याची समस्या दूर होण्यास मदत होईल . 
- मधुकरराव माने, ग्रामविकास अधिकारी टेंभुर्णी  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A campaign is underway to clean the main stream in the village of Tembhurni