गृहमंत्र्यांकडून पंढरपुरात पोलिस सदनिका व निवास प्रकल्प मंजुरीची अपेक्षा 

अभय जोशी
शुक्रवार, 26 जून 2020

येथील तालुका पोलिस ठाण्याच्या लगत ब्रिटिशकालीन पोलिस वसाहत आहे. अनेक गैरसोयींचा सामना करत तिथे पोलिस कर्मचारी राहत आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 361 सदनिका असलेल्या वसाहतीचा आराखडा तयार केला आहे. आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या काळात राज्यभरातून पंढरपुरात यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी येत असतात. या पोलिसांना यात्राकाळात शहरातील नगरपालिकेच्या शाळा, खासगी हायस्कूलमध्ये राहावे लागते. 
पंढरपूर येथील कायम नेमणुकीस असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत असावी. तसेच यात्रेत बंदोबस्तासाठी येणाऱ्या या कर्मचाऱ्यांची राहण्याची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने आराखडा तयार करून घेतला आहे. 

पंढरपूर(सोलापूर) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 361 सदनिका तसेच यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एक हजार 150 पोलिसांच्या निवासाची व्यवस्था असलेला प्रकल्प तीन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकल्पासाठी तसेच शहरातील सीसीटीव्ही आराखड्याच्या कार्यवाहीसाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

हेही वाचाः सोलापूरच्या दहा हजार ऑटोचालकांचा कमाईसाठी अजुनही संघर्षच... 

येथील तालुका पोलिस ठाण्याच्या लगत ब्रिटिशकालीन पोलिस वसाहत आहे. अनेक गैरसोयींचा सामना करत तिथे पोलिस कर्मचारी राहत आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 361 सदनिका असलेल्या वसाहतीचा आराखडा तयार केला आहे. आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या काळात राज्यभरातून पंढरपुरात यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी येत असतात. या पोलिसांना यात्राकाळात शहरातील नगरपालिकेच्या शाळा, खासगी हायस्कूलमध्ये राहावे लागते. 
पंढरपूर येथील कायम नेमणुकीस असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत असावी. तसेच यात्रेत बंदोबस्तासाठी येणाऱ्या या कर्मचाऱ्यांची राहण्याची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने आराखडा तयार करून घेतला आहे. 

हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात उद्यापासून सलूनची दुकाने सूरू 

प्रस्तावित पोलिस वसाहतीच्या मध्ये यात्रा बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी डॉर्मेटरीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सुमारे 125 कोटी रुपये खर्च या कामासाठी अपेक्षित आहे. वाई येथील गुरव असोसिएट्‌सचे आर्किटेक्‍ट संदीप गुरव यांनी हा आराखडा तयार केला आहे. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून हा आराखडा शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 
पंढरपूर शहरात यात्रांच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुलभ जावे यासाठी 150 ठिकाणी एकूण 400 सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव पंढरपूर नगरपालिकेने तयार केला आहे. त्याच्या कार्यवाहीसाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नगरपालिकेने त्याविषयीचा प्रस्ताव शासनाच्या नगररचना आणि गृह विभागाकडे पाठवला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून हे काम प्रस्तावित आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून दोन्ही कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister to approve police flat and housing project in Pandharpur