बार्शीत युवक कॉंग्रेसने केला कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान 

barshi yuvak.jpg
barshi yuvak.jpg
Updated on

बार्शी(सोलापूर): कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक कॉंग्रेसच्या वतीने कोविड-19 कोरोना पार्श्‍वभूमीवर कार्यरत सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी सेवा सप्ताह पार पडला. त्यामध्ये कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान करण्यात आला. 

सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे व जिल्हा प्रभारी गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनात बार्शी युवक कॉंग्रेसचे बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के यांनी सात दिवस सेवा सप्ताह साजरा केला. 

कॉंग्रेस यंग ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. विजय साळुंके, सोलापूर जिल्हा महिला कॉंग्रेस सोशल मीडिया संघटक ऍड. निवेदिता आरगडे, युवक कॉंग्रेसचे वसीम पठाण, महेश मुकटे, सुनील कात्रे, विशाल जाधव, दत्ता गाढवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
सेवा सप्ताहात बार्शी युवक कॉंग्रेसच्या वतीने तालुक्‍यातील गरजूंना धान्य व मास्क सॅनिटायझर किट देण्यात आले. तसेच तालुक्‍यातील मनरेगा योजनेतील मजुरांची समस्या जाणून घेत कामांची पाहणी केली. 
कोरोना महामारी संकटावर मात करण्यासाठी कार्यरत पोलिस प्रशासनातील पोलिस अधिकारी, कर्मचारी होमगार्ड, सुरक्षा सेवा दलातील तसेच आरोग्य विभागातील डॉक्‍टर, नर्सेस, वार्डबॉय, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालक, तहसील, नगरपालिका अधिकारी कर्मचारी, सामाजिक संघटना यांचा सत्कार केला. 
तालुक्‍यात सर्व पत्रकार, ब्लड बॅंक, मोफत अन्न धान्य वाटप करणारे अन्नछत्रालय, सामाजिक कार्यकतें, कॉंग्रेस पक्षाचे विविध स्तरावरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना महारष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सन्मानपत्र, मास्क देऊन त्यांचा सन्मान केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated
Ladki Bahin Yojana
maharashtra
Fuel Conservation: Mangalwedha Chairperson Deepali Tad Opts for ST Bus Ride
Marathi News Esakal
www.esakal.com